भारतभर सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. दिवसेंदिवस भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत तसेच मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अत्यंत गरीब कुटुंबापासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक क्रिकेटपटूंचे कुटुंबीय देखील या आजाराच्या तडाख्यात सापडले. त्याचवेळी, भारतीय महिला संघाची युवा यष्टीरक्षक प्रिया पुनिया हिची आई या आजारामुळे नुकतीच निधन पावली.
प्रियाच्या आईचे झाले निधन
प्रिया पुनियाच्या आईला काही दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचे निदान करण्यात आले होते. त्यांच्यावर दिल्लीस्थित रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी (१७ मे) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पती सुरेंद्र आणि मुले प्रिया आणि राहुल हे आहेत.
https://www.instagram.com/p/CPAUm6SNt5f/?utm_medium=copy_link
अशी आहे प्रियाची कारकीर्द
भारतीय महिला संघातील सर्वात सुंदर क्रिकेटपटू मानली जाणारी प्रिया देशांतर्गत क्रिकेटमध्ये आधी राजस्थानचे व सध्या दिल्लीचे प्रतिनिधित्व करते. यष्टीरक्षक असलेल्या प्रियाने आत्तापर्यंत भारतासाठी ७ वनडे व ३ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये तिने अनुक्रमे २२५ व ९ धावा बनविल्या आहेत. तीने वुमन्स टी२० चॅलेंजमध्ये देखील सहभाग घेतला आहे.
भारतीय महिला संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय महिला संघाला १ कसोटी सामना, ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत. या संघात प्रियालाही जागा देण्यात आली आहे.
या क्रिकेटपटूंच्या कुटुंबातील सदस्यांना झाली कोरोनाची बाधा
कोरोना या साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेत काही क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांना या आजाराची लागण झाली. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग तसेच, भारताच्या विश्वविजेत्या संघाचा सदस्य लेगस्पिनर पियुष चावला या दोघांच्याही वडिलांचे या आजारात निधन झाले. भारतीय महिला संघाची आक्रमक फलंदाज वेदा कृष्णमूर्ती हिला देखील आपली आई व बहीण या आजारामुळे गमवावी लागली.
Priya Punia's mother passed away yesterday. Deepest condolences to Priya and her family.
May her soul rest in peace ????
— Women’s CricZone (@WomensCricZone) May 18, 2021
भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्या आई वडिलांना देखील या आजाराचा संसर्ग झाला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याचेदेखील माता-पिता या आजारातून पूर्णत: बरे झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
WTC Final महामुकाबला तोंडावर; न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला, “भारताविरुद्ध खेळणे…”
लज्जास्पद! ‘या’ खेळाडूच्या फोनमध्ये सापडले अश्लील व्हिडिओ, बाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक






