महिला कॅरेबियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत ऍमेझॉन वॉरियर्स संघाकडून खेळत असलेल्या श्रेयंका पाटील धमाल कामगिरी करत आहे. तिने अलीकडेच खेळल्या गेलेल्या सामन्यात 4 षटकात 4 विकेट्स घेऊन इतिहास घडवला आहे. ती अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय महिला खेळाडू बनली आहे. विशेष म्हणजे, तिने अद्याप भारतीय महिला क्रिकेट संघात पदार्पणही केले नाहीये. त्यामुळे ती पहिलीच अशी भारतीय महिला खेळाडू बनली आहे, जी भारताकडून पदार्पण केल्याशिवाय परदेशी लीगमध्ये खेळत आहे. श्रेयंकाने महिला कॅरेबियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत आपल्या शानदार गोलंदाजीने इतिहास घडवला आहे.
विशेष म्हणजे, श्रेयंका पाटील (Shreyanka Patil) ही अवघ्या 21 वर्षांची आहे. महिला कॅरेबियन प्रीमिअर लीग (Womens Caribbean Premier League) स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात 3 सप्टेंबर रोजी गयाना ऍमेझॉन वॉरिअर्स विरुद्ध बार्बाडोस रॉयल्स (Guyana Amazon Warriors Women vs Barbados Royals Women) संघ आमने सामने होते. या सामन्यात ऍमेझॉन वॉरिअर्सकडून खेळताना बार्बाडोसविरुद्ध सीपीएलच्या इतिहासातील सर्वात्कृष्ट गोलंदाजी केली.
🇬🇾 @shreyanka_patil takes 4 WICKETS 🤯#MassyWCPL #WCPL23 #GAWvBR #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport #CPL23 pic.twitter.com/cHLuDcBPdk
— CPL T20 (@CPL) September 5, 2023
श्रेयंकाने 4 षटके गोलंदाजी करताना 8.50च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करत 34 धावा खर्च केल्या. तसेच, 4 मोठ्या विकेट्सही नावावर केल्या. तिने कर्णधार हेली मॅथ्यूज, रशादा विलियम्स, आलिया अलेने आणि चेडियन नेशन यांना तंबूचा रस्ता दाखवला. यासोबतच ती महिला कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत एका डावात 4 विकेट्स घेणारी पहिली गोलंदाज बनली.
स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज
याव्यतिरिक्त श्रेयंकाने स्पर्धेच्या चौथ्या सामन्यातही त्रिनबॅगो नाईट रायडर्सविरुद्ध गोलंदाजी करताना 4 षटकात 15 धावा खर्चून 2 विकेट्स घेतल्या. यामुळे ती स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी विराजमान झाली. श्रेयंकाने डब्ल्यूसीपीएल (WCPL) स्पर्धेत 3 सामने खेळताना सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, यादीत दुसऱ्या स्थानी एरिन बर्न्स असून तिनेही 3 सामने खेळत 5 विकेट्स घेतल्या आहेत.
डब्ल्यूपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळते श्रेयंका
महिला प्रीमिअर लीग स्पर्धेच्या उद्घाटनाच्या हंगामात श्रेयंका रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाकडून खेळताना दिसली होती. श्रेयंकाने आरसीबीकडून खेळताना 6 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. (Indian women Cricketer shreyanka patil creates history by taling 4 wicket in wcpl)
हेही वाचाच-
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने संघ तर निवडला, पण ‘या’ दिग्गज क्रिकेटर्सच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम
BREAKING । वर्ल्डकप 2023साठी ‘कांगारूं’चा 15 सदस्यीय संघ घोषित; स्टार खेळाडू बाहेर, तर ‘या’ पठ्ठ्याची एन्ट्री