आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या कसोटी सामन्यांचे वातावरण आहे. बहुतेक संघ सध्या कसोटी क्रिकेट खेळत आहेत. अशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे (आईसीसी) आयोजित विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही या महिन्यातच होणार आहे. आता या सगळ्या गोष्टीत महिला संघ का मागे राहील? म्हणून आज (१६ जून) पासून भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला यांचात एकमात्र कसोटी सामना होणार आहे.
भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला १६ जूनपासून काउंटी क्रिकेटचे मैदान, ब्रिस्टल येथे एकमेव कसोटी सामना खेळतील. या सामन्याची सुरुवात भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता होणार आहे. या संघाचे नेतृत्त्वपद मिताली राजकडे असून भारतीय महिला संघ या सामन्यासाठी गेले २ आठवडे कसून सराव करत आहे.
भारतीय महिला संघ जवळ जवळ ७ वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळणार आहे. तसेच इंग्लंड महिला संघाने सुद्धा गेली काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळलेले नाही. हा इंग्लंडचा ९६वा कसोटी सामना असेल. तर भारतीय महिला संघ ३७वा कसोटी सामना खेळतील.
भारतीय महिला संघाने १९७६ ला पहिला कसोटी सामना खेळला होता. परंतु, त्यानंतर भारतीय महिला संघ जास्त कसोटी क्रिकेट खेळताना दिसला नाही. भारतीय महिला आणि इंग्लंड महिलांनी आजवर १३ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय महिलांचे प्रदर्शन इंग्लंडविरुद्ध खूप छान राहिले आहे. कसोटीत यजमानांपेक्षा पाहुण्यांचे पारडे अधिक जड असल्याचे दिसून आले आहे. दोन्ही संघांनी आजवर १३ कसोटी सामने खेळताना त्यामध्ये भारतीय महिला संघ २ वेळा जिंकला आहे. तर इंग्लंड महिला संघ केवळ एकच सामना जिंकला आणि बाकी १० सामने अनिर्णीत राहिले आहेत.
इंग्लंडने मायभूमीत ८ कसोटी सामन्यांत भारतीय महिला संघाचा सामना केला आहे. तरीही त्यांना विजय मिळवता आलेला नाही. ब्रिस्टल मैदनावर जर भारतीय महिला संघ विजयी झाला तर, तो त्यांचा लागोपाठ चौथा विजय असेल. ऑस्ट्रेलिया महिला संघ सोडल्यास बाकी कोणत्याही महिला संघाने लागोपाठ ३ कसोटी सामने जिंकलेले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना माझ्यासाठी विश्वचषकाहून कमी नाही,’ पुजाराने फुंकले रणसिंग
‘हा’ खेळाडू भारताचा ठरेल एक्स फॅक्टर, एका तासात जिंकवेल सामना; बड्या फलंदाजांचा दावा
‘या’ युवा शिलेदारात मला रोहितची छबी दिसते, पाकिस्तानी क्रिकेटरकडून तोंडभरुन कौतुक