सध्या महिला आशिया चषक सुरु आहे. त्यामध्ये भारतानं सलग 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि विजयी रथ चालूच ठेवला आहे. आशिया चषकामध्ये भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) हाती आहे. तत्पूर्वी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमधील एक अविस्मरणीय क्षण सांगितला आहे.
हरमनप्रीत सांगितले की, सात वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 115 चेंडूत नाबाद 171 धावांची खेळी खेळली होती. हा दिवस तिच्यासाठी खूप खास होता. तिच्या खेळीत तिनं 20 चौकार आणि उत्तुंग 7 षटकार लगावले होते. पुढे हरमनप्रीतनं सांगितलं की, 171 धावा करायच्या एक दिवस आधी एका मित्रानं माझ्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली होती. त्यामुळे ती गोष्ट रात्रभर डोक्यामध्ये फिरत राहिली.
स्टार स्पोर्टशी बोलताना हरमनप्रीत कौर (Harmanpreet kaur) म्हणाली की, “2017मध्ये जेव्हा मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 171 धावा केल्या होत्या, तो दिवस माझ्यासाठी खास होता. मला आठवतंय त्या खेळीआधी एका मित्रानं मला सांगितलं होतं, ‘उद्या तू 150 धावा केल्या तरच आपण जिंकू.’ मी म्हणाले, ‘150 धावा?’ मी ऐकलं आहे की मी 100 धावा केल्या तर दुसऱ्या दिवशी जिंकेन. पण 150 धावा, ही एक अजीब मागणी होती, नाही का? उद्या जिंकण्यासाठी मला 150 धावा करायच्या आहेत. त्यामुळे ही गोष्ट रात्रभर माझ्या मनात घोळत राहिली.”
पुढे बोलताना हरमनप्रीत म्हणाली, “मी त्या रात्रभर विचार करत राहिले की, हा ऑस्ट्रेलियन संघ आहे आणि त्यामुळे त्यांना हरवण्यासाठी मला काहीतरी वेगळं करावं लागेल. कारण त्याचा संघ खूप मजबूत होता. त्यामुळे माझ्या मते, 177 धावांची नाबाद खेळी आणि तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता.”
हरमनप्रीतनं आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिनं 200 धावा केल्या आहेत. तर 69 ही तिची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. कसोटीमध्ये तिच्या नावावर 1 अर्धशतक आहे. 133 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये तिनं 3,565 धावा ठोकल्या आहेत. त्यामध्ये तिची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 71 आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये तिनं 18 अर्धशतक आणि 6 शतक झळकावले आहेत. तर 152 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तिनं 28.22च्या सरासरीनं 3,415 धावा केल्या आहेत. त्यामध्ये तिनं 12 अर्धशतक आणि 1 शतक झळकावले आहे. यादरम्यान तिची सर्वोच्च धावसंख्या 103 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
फेडरर-नदालच्या मक्तेदारीला आव्हान देणाऱ्या दिग्गजाचा टेनिसला अलविदा! सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट
94 वर्षापासून ‘या’ खेळाडूचं रेकाॅर्ड कायम! दिग्गज खेळाडू त्याच्या जवळपासही नाहीत
मेगा लिलावापूर्वी हैदराबादचा प्लॅन ठरला, 150चा स्पीड असणाऱ्या वेगवान गोलंदाजाला बसणार मोठा झटका!