टोकियो ऑलिंपिक २०२० मधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिंपिकसाठी अद्याप टोकियोमध्ये पोहोचली नाहीये. तिला येत्या ५ ऑगस्ट रोजी पहिला सामना खेळायचा आहे. ऑलिंपिक नियमांनुसार, तिला खेळ सुरू होण्याच्या एक आठवड्याआधी टोकियोमध्ये पोहोचणे आवश्यक आहे.
खरं तर विनेश हंगेरी बुडापेस्ट येथे ट्रेनिंग रकत होती. तेथून ती फ्रान्सच्या फ्रँकफर्ट येथे पोहोचली होती. विनेशला फ्रँकफर्टवरून टोकियोसाठी फ्लाईट पकडायची होती. मात्र, हे करण्यात ती अपयशी ठरली. तिचा युरोपीय संघाचा (EU) व्हिसाचा कार्यकाळ एक दिवस आधीच संपला होता. विनेश कुस्तीत भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई करणारी प्रबळ दावेदार आहे. तिने ५३ किलो वजनाच्या महिला फ्रीस्टाईल गटात भाग घेतला आहे. या प्रकारात ती अव्वल मानांकित प्राप्त खेळाडू आहे. (Indian Wrestler Vinesh Phogat Misses Flight From Frankfurt To Tokyo After Overstaying Eu Visa Tokyo Olympics)
विनेशला या दिवशी पोहोचायचे होते टोकियोत
विनेशला मंगळवारी (२७ जुलै) रात्री टोकियोला पोहोचायचे होते. मात्र, ती जेव्हा फ्रँकफर्ट विमानतळावर पोहोचली, तेव्हा तिला तिथे अडवण्यात आले. भारतीय ऑलिंपिक असोसिएशन (IOA)ने हे प्रकरण सोडवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनेश बुधवारी (२८ जुलै) पोहोचेल. आयओएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे जाणूनबुजून केलेले नाही. तिच्या व्हिसाचा कालावधी ९० दिवसांसाठी होता. मात्र, बुडापेस्टच्या फ्रँकफर्ट येथे पोहोचल्यानंतर समजले की, ती ९० दिवसांसाठी युरोपीय संघात होती.
We entered 2020 with so much hope and belief. Every athlete dreamt of going to the Olympics and doing well…
…
…
But unfortunately, something dramatically different was in store for us and it is still sinking in! pic.twitter.com/WwRemaaTHM— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) December 31, 2020
फ्रँकफर्ट विमानतळावर करण्यात आली विनेशची आरटी- पीसीआर
अधिकाऱ्याने सांगितले की, स्पोर्ट्स ऍथोरिटी ऑफ इंडिया (SAI)ने हे प्रकरण उचलून धरले आहे. यानंतर फ्रँकफर्टमध्ये भारतीय दूतावास हे प्रकरण सोडवण्यासाठी विमानतळावर पोहोचले. विनेश बुधवारी टोकियोला पोहोचेल. तिने या खेळांसाठी फिजिओ मान्यतेची मागणी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रँकफर्ट विमानतळावर विनेशची आरटी- पीसीआर चाचणीही करण्यात आली होती.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना
-जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?