कॅनबेरा। शुक्रवारी(4 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला टी20 सामना झाला. हा सामना 11 धावांनी जिंकून भारताने 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज टी नटराजनने महत्त्वाची भूमिका बजावली.
नटराजनने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच नटराजनने सर्वांना प्रभावित केले. त्याने 4 षटकात 30 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पणात 3 विकेट्स घेणारा तो जसप्रीत बुमराहनंतरचा दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे.
6 भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियामध्ये केले आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण
नटराजननच्या आधी प्रविण कुमार, इशांत शर्मा, राहुल शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण केले आहे. यांच्यातील केवळ बुमराह आणि नटराजनला पदार्पणाच्या सामन्यात प्रत्येकी 3 विकेट्स घेण्यात यश आहे. बुमराहने 2016 ला टी20 पदार्पण करताना 23 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या.
या दोघांव्यतिरिक्त हार्दिक पंड्याने टी20 पदार्पणात 2 विकेट्स घेतल्या होत्या. तर प्रविण आणि राहुलने प्रत्येकी 1 विकेट टी20 पदार्पणात घेतली होती. इशांतला मात्र टी20 पदार्पणात विकेट घेण्यात अपयश आले.
ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण करणारे भारतीय आणि त्यांची कामगिरी
जसप्रीत बुमराह – 2016 (23 धावांत 3 विकेट्स)
टी नटराजन – 2020 (30 धावांत 3 विकेट्स)
हार्दिक पंड्या – 2016 (37 धावांत 2 विकेट्स)
प्रविण कुमर – 2008 (15 धावांत 1 विकेट)
राहुल शर्मा – 2012 (27 धावांत 1 विकेट)
इशांत शर्मा – 2008 (8 धावांत एकही विकेट नाही.)
महत्त्वाच्या बातम्या –
नटराजनचा ऑस्ट्रेलियात डंका, केली बुमराहच्या विक्रमाची बरोबरी
कमाल लाजवाब…! जगात फक्त तीन फलंदाजांना करता आलेला विक्रम केएल राहुलच्याही नावावर
सर जडेजाने धोनीला टाकले मागे, आठ वर्षांपूर्वीच्या विक्रमावर कोरले आपले नाव
ट्रेंडिंग लेख-
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर