---Advertisement---

गोलंदाजीनंतर फलंदाजीतही शार्दुलचा दे घुमा के! इरफान-अश्विनच्या ‘त्या’ विक्रमाची केली बरोबरी

On: रविवार, जानेवारी 17, 2021 12:17 PM
---Advertisement---

ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना सुरु असून आज (१७ जानेवारी) सामन्याचा तिसरा दिवस चालू आहे. यादिवशी सकाळचे सत्र संपेपर्यंत भारताचे अर्ध्याच्या वर खेळाडू तंबूत परतल्याने संघाची गाडी डगमगली होती. परंतु खालच्या फळीत फलंदाजीला उतरत वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी शतकाच्या जवळपास भागिदारी रचली आहे. दरम्यान शार्दुलच्या खात्यात एक खास विक्रम जमा झाला आहे.

हा २९ वर्षीय खेळाडू यष्टीरक्षक रिषभ पंतची विकेट पडल्यानंतर खालच्या फळीत आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने आक्रमक पवित्रा अंगीकारत ५० चेंडूत वीसहून अधिक धावा केल्या. यापुर्वी वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून ८ ते ११ या दरम्यानच्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने २० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तळातील ८ ते ११ क्रमांकावर फलंदाजी करताना २० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा मोठा विक्रम शार्दुलच्या नावावर झाला आहे.

शार्दुलपुर्वी माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठान आणि भारताचा फिरकीपटू आर अश्विन यांनी हा विक्रम केला आहे. इरफान आणि अश्विन यांनी देखील वनडे, टी२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये तळातील क्रमांकावर फलंदाजी करताना २० धावांचा आकडा पार केला होता.

पहिल्या डावात शार्दुलचे अर्धशतक

अखेर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने शार्दुलला त्रिफळाचीत केले. त्यामुळे ११५ चेंडूत ६७ धावा करत तो मैदानाबाहेर पडला. यानंतर भारतीय संघाचा डाव ७ बाद ३०९ धावांवर आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पहिल्या डावातील ३७० धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी भारताला केवळ ६४ धावांची आवश्यकता आहे.

तब्बल तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांची काढली विकेट 

तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाच्या डावात गोलंदाजी करताना शार्दुलने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन केले होते. २४ षटकात ९४ धावा देत त्याने ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांना तंबूत पाठवले होते. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस हॅरीस हा त्याची पहिली कसोटी ठरला होता. त्यानंतर कर्णधार टीम पेन आणि गोलंदाज पॅट कमिन्स यांना त्याने बाद केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : शार्दुल ठाकूर – वॉशिंग्टन सुंदरची अर्धशतके पूर्ण; भारताचा ३०० धावांचा टप्पा पार..

कॅमरॉन ग्रीनने चित्त्याच्या चपळाईने एकहाती पकडला रिषभ पंतचा भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

‘तो’ चेंडू टाकला आणि रोहितची विकेट मिळाली, नॅथन लायनने केला रणनीतीचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---