सध्या सर्वत्र टोकियो ऑलिम्पिकचे वारे वाहत आहेत. त्याचबरोबर जगातील सर्वच देशातील खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. पण त्यात काहींच्या प्रयत्नांना यश मिळत आहे, तर काहींच्या प्रयत्नांना अपयश मिळत आहे. भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर आणि संजीव राजपूत हे पुरुषांच्या ५० मीटर रायफल स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आहेत.
क्वालिफिकेशनमध्ये गेल्या वर्षी नवी दिल्ली आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणाऱ्या ऐश्वर्यने ११६७ गुणांसह २१ वे, तर संजीवने ११५७ गुणांसह ३२ वे स्थान मिळवले आहे. रशियन ऑलिम्पिक समितीच्या सेर्गेई कामेंस्कीने क्वालिफिकेशनमध्ये ११८३ गुणांसह अव्वल स्थान मिळवले.
इतर अंतिम स्पर्धकांमध्ये चीनचा चांघोंग झांग, नॉर्वेचा जोआन हर्मन हेग, सर्बियाचा मिलेन्को सेबी, क्रोएशियाचा मिरान मारीचिक, युक्रेनचा सेर्ही कुलीश, क्रोएशियाचा पेटार गोर्श आणि बेलारूसचा युरी शेरबातसेविच यांचा समावेश होता. ऐश्वर्यने चांगली सुरुवात केली होती आणि क्वेंचिंग पोझिशन्सच्या पहिल्या सिरिजमध्ये ९९ स्कोर केले होते. दुसऱ्या सिरिजमध्येही त्याने योग्य फटका मारला, पण तिसऱ्या सिरिजमध्ये तो ९५ वर घसरला. ऐश्वर्यने क्नीलिंग एकूण ३९७ स्कोर केले आणि दुसरे स्थान मिळवले होते.
ऐश्वर्यने प्रोन पोझिशन सिरिजमध्ये ९८ आणि ९९ च्या स्कोरने सुरुवात केली होती. पण त्याच्या पुढील दोन सिरिजमध्ये ९७ स्कोरच्या राहिल्या. त्याला ३९१ च्या स्कोरसह टॉप ८ मध्ये स्थान मिळवता आले नाही. दुसरीकडे अनुभवी संजीव संपूर्ण इव्हेंटमध्ये पात्रता मिळवू शकला नाही. त्याने क्नीलिंग पहिल्या दोन सिरिजमध्ये ९६ आणि ९९ आणि तिसऱ्या सिरिजमध्ये ९५ चा शॉट मारला होता. संजीवने अंतिम सिरिजमध्ये ९७ स्कोर केला, पण ३८७ स्कोरसह २५ वे स्थान मिळवले.
संजीवने प्रोन मध्ये चांगली सुरुवात केली आणि दुसऱ्या सिरिजमध्ये ९७ आणि १०० स्कोर केले. त्यानंतर त्याने ९८ च्या शॉटसह ३९३ स्कोर केला आणि २३ वे स्थान मिळवले. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून ऐश्वर्य आणि संजीवने अंतिम फेरीत पोहचले नाहीत, त्यामुळे नेमबाजीत एकही पदक भारताला मिळू शकले नाही. अन्य सर्व भारतीय नेमबाजांची आव्हाने संपली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
चक दे इंडिया! पुरुष आणि महिला हॉकी संघाची टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी
टोकियो ऑलिम्पिक: भारताच्या कमलजीत कौरनं थाळीफेकीत फायनल गाठली, पण पदक हुकलं