---Advertisement---

या संघांविरुद्ध टीम इंडियाने मिळवले आहेत सर्वाधिक टी२० विजय

On: बुधवार, जानेवारी 8, 2020 9:53 AM
---Advertisement---

इंदोर। मंगळवारी(7 जानेवारी) होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका संघात दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवत टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताचा हा श्रीलंकेविरुद्धचा आंतरराष्ट्रीय टी20मधील 12 वा विजय होता. त्यामुळे भारताने आता आपल्या प्रतिस्पर्धी संघामध्ये सर्वाधिक टी20 विजय श्रीलंकेविरुद्ध मिळवण्याचा पराक्रम केला आहे.

भारताने श्रीलंकेविरुद्ध एकूण 18 सामने खेळले आहेत. त्यातील 12 सामन्यात विजय तर 5 सामन्यात पराभव स्विकारला आहे आणि 1 सामना अनिर्णित राहिला होता.

श्रीलंकेपाठोपाठ भारताने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 11 विजय मिळवले आहेत.

मंगळवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 बाद 142 धावा केल्या होत्या आणि भारताला 143 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने 17.3 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये या संघांविरुद्ध भारतीय संघाने मिळवले सर्वाधिक विजय – 

12 विजय – विरुद्ध श्रीलंका

11 विजय – विरुद्ध ऑस्ट्रेलिया

10 विजय – विरुद्ध बांगलादेश

10 विजय – विरुद्ध वेस्ट इंडिज

9 विजय – विरुद्ध दक्षिण आफ्रिका

7 विजय – विरुद्ध इंग्लंड

6 विजय – विरुद्ध पाकिस्तान

5 विजय – विरुद्ध झिम्बाब्वे

3 विजय – विरुद्ध आयर्लंड

3 विजय – विरुद्ध न्यूझीलंड

2 विजय – विरुद्ध अफगाणिस्तान

1 विजय – विरुद्ध संयुक्त अरब अमिराती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---