भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली भारतीय संघ टी20 मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये (27 जुलै ते 30 जुलै) दरम्यान 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. त्यामध्ये भारतानं चमकदार कामगिरी केली आणि 3-0 नं टी20 मालिका खिशात घातली. तर भारत-श्रीलंका यांच्यामध्ये (2 ऑगस्ट) रोजी 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. हा सामना टाय झाला. तत्पूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या रेकाॅर्डची बरोबरी भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीरनं अवघ्या 4 सामन्यातच केली.
गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यापासून हा त्याचा पहिलाच दौरा आहे. भारतानं त्याच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 4 सामने खेळले. त्यामध्ये 3 टी20 आणि 1 एकदिवसीय सामन्याचा समावेश आहे. गंभीरनं बरोबरी केलेल्या द्रविड यांच्या रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं, तर द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 160 सामने खेळले. त्यामध्ये फक्त 2 सामने टाय झाले आहेत. तर गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 4 सामने खेळले आणि आतापर्यंत त्यातील 2 सामने टाय झाले आहेत.
भारतीय संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल (Gautam Gambhir) बोलायचं झालं, तर त्याचं वय सध्या 42 वर्ष आणि 294 दिवस आहे. गंभीरनं भारतासाठी 2003 साली पदार्पण केलं होतं. गंभीरनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये भारतासाठी 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी20 सामने खेळले आहेत.
58 कसोटी सामन्यात गंभीरनं 41.95च्या सरासरीनं 4,154 धावा केल्या. यादरम्यानं त्यानं 22 अर्धशतकांसह 9 शतकं झळकावली. तर 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 5,238 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 39.68 आणि स्ट्राईक रेट 85.25 राहिला. एकदिवसीय सामन्यांमध्ये गंभीरनं 34 अर्धशतक आणि 11 शतक ठोकले आहेत. 37 टी20 सामन्यात त्यानं 119.2च्या स्ट्राईक रेटनं 932 केल्या आहेत. टी20 मध्ये त्याच्या नावावर 7 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पदकाची आशा वाढली! दीपिका कुमारीची क्वार्टर फायनलमध्ये एंट्री, भजन कौरच्या हाती निराशा
टी20 वर्ल्डकच्या 2007 च्या फायनलमधील हिरोने 12 वर्षांनंतर घेतली माहीची भेट, व्हिडिओ तुफान व्हायरल
भारतासाठी हार्ट ब्रेक…मनू भाकरचं तिसरं ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं