पुणे, 18 फेब्रुवारी 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या निकी कलियांदा पोनाचा याने सनसनाटी वविजयासह दिमाखात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत भारताच्या जागतिक क्रमवारीत 791व्या स्थानी असलेल्या निकी कलियांदा पोनाचा याने जागतिक क्र.215 खेळाडू पोर्तुगलच्या गोंकालो ऑलिव्हिराचा टायब्रेकमध्ये 6-3,6-7(2), 7-6 (3) असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना 2तास 37मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये निकी याने ऑलिव्हिराची आठव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये ऑलिव्हिराने सुरेख खेळ करत निकीविरुद्ध हा सेट 7-6(2) असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये निकीने टायब्रेकमध्ये जोरदार खेळत करत ऑलिव्हिरा विरुद्ध हा सेट 7-6 (3) असा जिंकून विजय मिळवला. याआधी 28 वर्षीय निकी याने डेव्हिस कप स्पर्धेत पाकिस्तान येथील सामन्यात 4-0 असा विजय प्राप्त करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
पाचव्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या दालीबोर सेव्हरसिना याने ऑस्ट्रेलियाच्या फिलिप सेकुलिकचा 6-4, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाच्या ट्रिस्टन स्कूलकेट याने फ्रांसच्या जेफ्री ब्लँकॅनॉक्सचा 7-6 (7), 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत.
याआधी अंतिम पात्रता फेरीत माजी जागतिक क्र.17 खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिकने युक्रेनच्या वादेम उरसुचा 6-2, 6-2 असा तर, ग्रेट ब्रिटनच्या फेलिक्स गिल याने रशियाच्या इव्हगेनी डोन्स्कॉयचा 7-5, 6-2 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. बेलारूसच्या राफेल कॉलिग्नन याने फ्रांसच्या माजी जागतिक क्रमवारीत 50 खेळाडू बेंजामिन बोन्झीचा 7-5, 6-7 (6), 6-3 असा पराभव करून त्याचे आव्हान संपुष्टात आणले. याआधी गतवर्षी एटीपी २५० स्पर्धेत बेंजामिन बोन्झीने अंतिम फेरी गाठली होती. (India’s Niki Pona advances to second round of PMRDA-sponsored Grand Open ATP Challenger 100 Men’s International Tennis Tournament)
निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी:
निकी कलियांदा पोनाचा(भारत)वि.वि.गोंकालो ऑलिव्हिरा(पोर्तुगल)6-3, 6-7 (2), 7-6 (3)
दालीबोर सेव्हरसिना(चेक प्रजासत्ताक)(५)वि.वि.फिलिप सेकुलिक(ऑस्ट्रेलिया) 6-4, 6-3;
ट्रिस्टन स्कूलकेट(ऑस्ट्रेलिया)वि.वि.जेफ्री ब्लँकॅनॉक्स (फ्रांस)7-6 (7). 6-3
अंतिम पात्रता फेरी:
बर्नार्ड टॉमिक(ऑस्ट्रेलिया)वि.वि.वादेम उरसु(युक्रेन) 6-2, 6-2
फेलिक्स गिल(ग्रेट ब्रिटन)वि.वि.इव्हगेनी डोन्स्कॉय(रशिया) 7-5, 6-2
अलेक्सी झाखारोव्ह वि.वि.युन सीओंग चुंग(कोरिया)6-3, 5-7, 6-4
राफेल कॉलिग्नन(बेलारूस)वि.वि.बेंजामिन बोन्झी(फ्रांस)7-5, 6-7 (6), 6-3
वासेक पोस्पिसिल(कॅनडा)वि.वि. कायची उचिडा(जपान)6-7 (4), 7-6 (4), 6-2
महत्वाच्या बातम्या –
‘आता गमावण्यासाठी काहीच राहिलं नाही…’, टीम इंडियातील संधीबाबत मनोज तिवारीचा धोनीला थेट प्रश्न
आश्रमात दर्शनासाठी आलेल्या राहुलला चाहत्यांनी घेरले, पाहा आई-वडिलांना कशी काढून दिली वाट