भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसचा फटका भारतीय क्रीडासृष्टीलाही बसताना दिसत आहे. आत्तापर्यंत अनेक दिग्गज क्रीडापटू कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. नुकतेच असे वृत्त समोर आले की एमके कौशिक आणि रविंद्र पाल सिंग या दोन ऑलिंपिकवीर हॉकीपटूंचे शनिवारी (८ मे )निधन झाले.
एमएके कौशिक यांनी दिल्लीमध्ये तर रविंद्र पाल सिंग यांनी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. या दोघांनी काही सामने एकत्र खेळले होते. कौशिक आणि सिंग हे दोघेही १९८० साली मॉस्को येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. सिंग यांनी यानंतर १९८४ साली लॉस एंजल्स येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये देखील भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. कौशिक यांच्या निधनाबद्दल त्यांचा मुलगा एहसान याने माहिती दिली.
६६ वर्षीय कौशिक हे फुफ्फुसांच्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. तसेच त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची ही लढाई अपयशी ठरली.
Hockey India griefs the loss of Mr. M. K. Kaushik, Gold Medal winning Olympian and former Coach of the Indian Hockey Team. 🕯#IndiaKaGame pic.twitter.com/CQxcTdry3D
— Hockey India (@TheHockeyIndia) May 8, 2021
कौशिक यांनी खेळाडू म्हणून कारकिर्द संपल्यानंतर प्रशिक्षण क्षेत्रातही आपला ठसा उमटवला होता. त्यांना २००२ साली द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १९८८ सालच्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे ते प्रशिक्षक होते. तसेच त्यांनी भारतीय महिला हॉकी संघालाही प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला हॉकी संघाने २००६ साली दोहा येखील आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.
Saddened to learn about the loss of former India International who was part of the Gold Medal winning Indian squad at the 1980 Moscow Olympics, Mr. Ravinder Pal Singh.
Hockey India sends its condolences to his family and loved ones. 🙏#IndiaKaGame pic.twitter.com/vHjIQlrDqW
— Hockey India (@TheHockeyIndia) May 8, 2021
रविंद्र पाल सिंग यांचेही निधन
६० वर्षीय रविंद्र पाल सिंग यांना २४ एप्रिल रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने लखनऊ येखील हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच असे समजत आहे की त्यांचा काही दिवसांनी कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, शुक्रवारी अचानक त्यांना त्रास व्हायला लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अखेर त्यांनी शनिवारी शेवटचा श्वास घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेट जगताला धक्का! कोरोनाने घेतला दिग्गज भारतीय स्कोररचा बळी
टीम इंडियात झाली अर्झन नागवासवालाची एंट्री, तब्बल ४६ वर्षांनंतर घडला ‘हा’ इतिहास