बांगलादेशचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात कसोटी मालिका सुरू आहे. कसोटी मालिकेनंतर 6 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 टी20 सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेसाठी आज (28 सप्टेंबर) संध्याकाळी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
टी20 संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे कायम ठेवण्यात आले आहे. तर कसोटीचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, यष्टीरक्षक रिषभ पंत अशा वरिष्ठ खेळाडूंना टी20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
NEWS 🚨 – #TeamIndia’s squad for T20I series against Bangladesh announced.
More details here – https://t.co/7OJdTgkU5q #INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/DOyz5XGMs5
— BCCI (@BCCI) September 28, 2024
बांगलादेशविरुद्धच्या 3 टी20 सामन्यांसाठी भारताचा संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव
महत्त्वाच्या बातम्या-
5 क्रिकेटपटू ज्यांनी कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली, नंतर फलंदाजीत कमावलं नाव
कानपूर कसोटीत पावसाचा धुमाकूळ, तब्बल 9 वर्षांनंतर भारतात असं घडलं
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत केन विल्यमसनच्या नावे नकोसा विक्रम! काय घडलं जाणून घ्या