---Advertisement---

जागतिक कुस्ती दिनीच भारताच्या अव्वल कुस्तीपटूला अटक, सहा राज्यांमध्ये होता फरार

On: रविवार, मे 23, 2021 8:26 PM
---Advertisement---

कुस्तीपटू सागर धनखड हत्या प्रकरणात आज अखेर दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा अव्वल कुस्तीपटू सुशीलकुमारला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी सुशीलकुमारला आणि त्याचा सहकारी अजय यांना जवळपास दोन आठवड्यांच्या शोधमोहीमेनंतर अटक केली. दिल्ली पोलिसांनी हे दोघेही फरार असल्याने लूक आउट नोटीस जारी केली होती. अखेर हे दोघे पंजाबमध्ये सापडल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

जागतिक कुस्ती दिनीच अटक
आज, २३ मे रोजी जागतिक कुस्ती दिन साजरा केला जातो. मात्र याच दिवशी भारताच्या अव्वल कुस्तीपटूवर अटक होण्याची नामुष्की ओढावली आहे. ५ मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियम मध्ये झालेल्या हाणामारीत कुस्तीपटू सागर धनखडचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सुशीलकुमारचा सहभाग असल्याचे समोर आल्यावर कुस्ती महासंघाने देखील भारतीय कुस्ती क्षेत्राची नाचक्की झाल्याचे म्हंटले होते. आता कुस्ती दिनाच्या दिवशीच त्याला अटक झाल्याने भारतीय कुस्ती क्षेत्राला मोठा झटका बसला आहे.

सहा राज्यांमध्ये होते फरार
सुशीलकुमार विरूद्ध वॉरंट जारी झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावल्यानंतर त्याला अटक होईल हे नक्की होते. मात्र या दरम्यान सुशीलकुमार आणि त्याचा साथीदार, हे दोघेही बेपत्ता होते. जवळपास सहा राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या अठरा दिवसांदरम्यान त्यांनी प्रवास केला. यात उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, चंडीगढ आणि पंजाब या प्रदेशांचा समावेश होता. या दरम्यान त्यांनी आपला पत्ता लागू नये, यासाठी सातत्याने मोबाईल मधील सिम कार्ड देखील बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न असफल ठरल्याने अखेर ते दिल्ली पोलिसांच्या हाती लागले.

काय आहे हे प्रकरण?
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये ५ मे रोजी कुस्तीपटूंच्या दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली होती. या हाणामारीत एकूण पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी सागर धनखड नावाच्या कुस्तीपटूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी एफआयआरमध्ये दोन वेळचा ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याचे देखील नाव समोर आले होते. त्यांनतर पोलिसांनी केलेल्या तपासात सुशील कुमारचा या घटनेमध्ये सहभाग असल्याचे पुरावे मिळाले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

जेव्हा ब्रेट लीची गोलंदाजी खेळतांना आकाश चोप्राला फुटला होता घाम, पाहा व्हिडिओ

दीपिका पदुकोण ते किम शर्मा! या बॉलीवूड अभिनेत्रींसह होते युवराजचे अफेअर

असला कसला अंपायर? गोलंदाजाला आणले रडकुंडीला, पाहा मजेदार व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---