आशिया चषक 2023 क्रिकेट स्पर्धेमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर सर्वांचे लक्ष होते. परंतु, हा सामना रद्द झाला. त्याच वेळी शनिवारी (2 ऑगस्ट) ने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम भारतीय पुरुष हॉकी संघाफेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने 2-0 असा विजय मिळवला. पूर्णवेळ संपल्यावर सामना 4-4 असा बरोबरीत सुटला, त्यामुळे पेनल्टी शूटआऊटचा सहारा घ्यावा लागला. जरी भारत पकिस्तान-सामना रद्द झाला असला तरी, हॉकी संघाने बाजी मारली.
शूटआऊटमध्ये भारतीय हॉकी संघाकडून मनिंदर सिंग आणि गुरज्योत सिंग यांनी गोल केले. तर भारताचा हॉकी यष्टिरक्षक सूरज करकेराने पाकिस्तानच्या अर्शद लियाकत आणि मोहम्मद मुर्तझा यांना शूटआऊटमध्ये गोल करण्यापासून रोखले. भारताकडून मोहम्मद राहिलने पूर्ण वेळेत दोन गोल केले. याशिवाय जुगराज सिंग आणि मनिंदर सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला. राहिलने 19 व्या आणि 26 व्या मिनिटाला संघासाठी गोल केले. 7 व्या मिनिटाला जुगराज सिंगने तर 10 व्या मिनिटाला मनिंदर सिंगने गोल केला.
पाकिस्तान संघासाठी अब्दुल रहमान, झिकारिया हयात, अर्शद लियाकत आणि कर्णधार अब्दुल राणा यांनी प्रत्येकी 1 गोल करत गुणसंख्या 4-4 अशी बरोबरी साधली. यानंतर खेळ पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहचला, जिथे भारताने 2-0 ने विजय मिळवला. यापूर्वी भारतीय संघाला एलिट पूल स्टेजमध्ये पाकिस्तानविरुद्ध 4-5 असा पराभव पत्करावा लागला होता. अंतीम सामन्यातील भारताच्या विजयाबद्दल पंतप्रधानांनीही अभिनंदन केले. नरेंद्र मोदींच्या ट्विटर हँडलने ट्विट केले, “हॉकी 5s आशिया कपमध्ये चॅम्पियन!!”
भारीतय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान संघाचा क्रिकेट सामना
भारीतय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान संघात रंगलेला आशिया चषकाती तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीपुढे भारतीय संघातील सलामवीर रोहित शर्मा, शुभन गिल आणि विराट कोहली यांचे त्रिफळ उडवत पाकिस्तानने आपली दहशत निर्माण केली. परंतु, भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याने संघाला सावरले. त्याची साथ देत हार्दिक पंड्या आणि ईशान यांनी 138 धावांची भागीदारी केली. आणि संघाला 268 धावा मिळवण्यास यश आले. (Indin hocky team win asia cup against paksitan)
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप 2023 मधून राहुलचा पत्ता कट? ईशानच्या पकिस्तानविरुद्धच्या दमदार खेळीमुळे क्रिकेट विश्वात चर्चा
कुठे आणि कसा पाहायचा बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामना?, लगेच जाणून घ्या