---Advertisement---

INDvENG: सॅम करन आणि हार्दिक पंड्याच्या शाब्दिक बाचाबाची मागे ‘हे’ आहे कारण?

---Advertisement---

पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी(२६ मार्च) इंग्लंडने ६ विकेट्सने जिंकला. त्यामुळे १-१ अशी बरोबरी झाली आहे. मात्र, या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करन आणि भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते.

ही घटना भारतीय संघ फलंदाजी करत असताना ४६ व्या षटकात घडली होती. या षटकात सॅम करन गोलंदाजी करत होता. तो या षटकातील शेवटचा चेंडू टाकून झाल्यानंतर हार्दिकला काहीतरी बोलला. ते ऐकून हार्दिक त्याच्यामागे धावला आणि त्याच्याशी बोलायला लागला. त्यांच्यातील वाद वाढलेला पाहून पंच मधे पडले आणि त्यांनी या दोघांना वेगळे केले.

या घटनेनंतर सॅम आणि हार्दिकमध्ये नक्की वाद का झाले याबद्दल चर्चा सुरु झाली. तरी सध्या असा कयास लावला जात आहे की ४६ व्या षटकात पंड्याने सॅमच्या गोलंदाजीवर २ षटकार ठोकले होते; तसेच याच षटकात रिषभ पंतनेही षटकार ठोकला होता; त्याचबरोबर षटकाच्या पहिल्या ५ चेंडूतच २१ धावा निघाल्याने सॅम निराश झाला असावा आणि त्याच निराशेच्या भरात त्याने हार्दिकला काहीतरी बडबड केली असावी.

या सामन्यात हार्दिक १६ चेंडूत ३५ धावा करुन शेवटच्या षटकात बाद झाला.

https://twitter.com/CowCorner9/status/1375409707146338314

इंग्लंडने मिळवला विजय – 

इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. भारतीय संघानेही याचा फायदा घेत ५० षटकात ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा करत इंग्लंडला ३३७ धावांचे आव्हान दिले. प्रतिउत्तरादाखल ३३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने ४३.३ षटकात पूर्ण केला आणि हा सामना जिंकला. हा सामना इंग्लंडने जिंकल्याने मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे आता रविवारी (२८ मार्च) होणारा मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

INDvENG: मालिका विजयासाठी दोन्ही संघांमध्ये चूरस; कुठे व केव्हा होणार तिसरा वनडे, जाणून घ्या सर्वकाही

बीसीसीआयचा ‘सॉफ्ट सिग्नल’ आयपीएलमधून हटवला; ‘या’ नियमांमध्येही झाले बदल

सचिन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पीटरसनने मारला टोमणा, युवराजने दिले ‘असे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---