Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाबर आझमचा अपमान करणे पडले महागात, पाकिस्तानी ‘या’ खेळाडूला मिळाली कायदेशीर नोटीस

बाबर आझमचा अपमान करणे पडले महागात, पाकिस्तानी 'या' खेळाडूला मिळाली कायदेशीर नोटीस

November 21, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Babar azam

Photo Courtesy-Twitter/Babar Azam


टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा नुकतीच पार पडली. यंदाच्या टी-20 विश्वचषकावर इंग्लंड संघाने आपले नाव कोरले. तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तान संघावर टीकेची झुंबड उडाली. या विश्वचषकाच्या साखळी सामन्यात पाकिस्तान संघाला झिम्बाब्वे संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्यावर बऱ्याच पाकिस्तानी दिग्गजांनी टीका केली. त्याचबरोबर बाबर आझम याचा चुलत भाऊ असलेल्या कामरान अकमल याने देखील त्याच्यावर टीका केली आणि त्याला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला देखील दिला.

झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने लाजीरवाणा पराभव केला. त्यानंतर कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचा चुलत भाऊ कामरान अकमल (Kamrn Akmal) याने त्याच्यावर तीक्ष्ण टीका केली. त्यानंतर पाकिेस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अकमलला ही नोटीस त्याच्या यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाकिस्तान संघावर अपमानजनक, खोट्या आणि आपत्तीजनक टीका या कारणामुळे आली. अकमल व्यतिरीक्त शोएब अख्तर (Shoaib Akhtar), वसीम अक्रम (Wasim Akram) आणि वकार यूनिस (Waqar Younis) या दिग्गजांनी देखील वेगवेगळ्या टीव्ही माध्यमातून पाकिस्तान संघावर टीका केली. खासकरून तेव्हा जेव्हा पाकिस्तान संघाला झिम्बाब्वेकडून अपमानजनक पराभव मिळाल्यानंतर उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झालेला.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्ष कामरानच्या कोणत्या टीकेमुळे नाराज झाले आणि त्यांनी त्यावर लगेच त्यांनी कायदेशीर पाऊल उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती असणाऱ्या व्यक्तीने माध्यमांशी बोलताना सांगितले की,”
कामरानवर कोणते आरोप लावण्यात आले याची मला अजून पूर्ण माहिती नाहीये, पण त्याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कारण, अध्यक्षांना वाटतय की कामरानने मिडीयामध्ये त्यांच्याबद्दल अपमानजनक, खोट्या आणि आपत्तीजनक टीका केल्या होत्या. ”

या नोटीसमुळे कामरानवर कोणत्या प्रकारची कायदेशीर कारवाई होऊ शकते हे पाहण्याजोगे राहिल. मात्र, टीका करताना
खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी थोडेसे भान नक्कीच ठेवले पाहिजे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिक्स पॅक्स असावेत तर भारतीयांसारखे! समुद्रकिनारी दिसली हार्दिक पंड्या आणि कंपनी
रोहित-राहुलच्या अनुपस्थितीत कोण करणार ओपनिंग? पर्यायांनी वाढली कॅप्टन हार्दिकची डोकेदुखी


Next Post
Hardik-Pandya

मायकल वॉन विरुद्ध भारतीय संघ! हार्दिक पंड्याचे माजी इंग्लिश कर्णधाराला प्रत्युत्तर

Photo Courtesy: Twitter/ICC

'तू खरा मुस्लीम नाही म्हणूनच...', माजी दिग्गजाची मोहम्मद रिजवानवर घणाघाती टीका

Shami, Kohli, Arshdeep Singh Axar Patel

'न्यूझीलंड दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी द्या', बलाढ्य संघाच्या माजी दिग्गजाकडून अर्शदीपचे कौतुक

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143