पाकिस्तान क्रिकेट संघाच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष इंझमाम उल हक याचा राजीनामा स्वीकारला आहे. इंझमाम उल हक यानी हितसंबंधांच्या संघर्षामुळे निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि आता पीसीबीने त्याचा राजीनामा स्वीकारला आहे. नवीन अध्यक्षांची लवकरच घोषणा केली जाईल, असं सांगण्यात आले आहे.
इंझमाम उल हक (Inzmam Ul Haq) याच्यावर हितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप होता आणि या कारणास्तव त्यांनी 30 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वास्तविक, तल्हा रहमानी यांच्या प्लेयर मॅनेजमेंट कंपनीमध्ये इंझमाम उल हकची कथित भागीदारी असल्याचा आरोप करण्यात आला होता. ही कंपनी इंझमाम आणि बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांसारख्या दिग्गज पाकिस्तानी खेळाडूंसाठी एजंट म्हणून काम करते. यामध्ये, हितसंबंधांच्या संभाव्य संघर्षाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता आणि त्यामुळे तपास निष्पक्षपणे व्हावा म्हणून इंझमाम उल हक यांना राजीनामा द्यावा लागला होता. पीसीबीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
राजीनामा दिल्यानंतर इंझमाम-उल-हक यानी मोठी प्रतिक्रिया देत आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, “कोणतीही चौकशी न करता लोक काहीही बोलतात. माझ्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते, त्यामुळे मी राजीनामा देणे योग्य मानले आहे. पीसीबीला माझी चौकशी करायची असल्यास मी उपलब्ध आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप करण्यात आले असून तसे काही असेल तर समोर आणा. खेळाडूंच्या एजंट कंपनीशी माझा कोणताही संबंध नाही आणि अशा आरोपांमुळे मला त्रास होत आहे. पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याचे मला फोनवरून सांगण्यात आले, त्यामुळे चौकशी सुरू असताना मी राजीनामा दिला तर बरे होईल, असे बोर्डाने सांगितले. जेव्हा सर्व काही ठिक होईल तेव्हा मी पुन्हा पीसीबीसोबत असेन.”
पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत आणि त्यातील 4 सामने त्यांनी जिंकले आहेत. त्यातच त्यांना आता उपांत्य सामन्यात जाण्याच्या आशा लागल्या आहेत. (Inzamam-ul-Haq resignation accepted by PCB big allegations were made)
म्हत्वाच्या बातम्या
नाद केला पण पुरा केला! वर्ल्डकप 2023मध्ये लंकन फलंदाजाने ठोकली वेगवान फिफ्टी, दोघांचा विक्रम तुटला
पहिल्या 5 ओव्हरमध्येच श्रीलंकेला धक्क्यावर धक्के! बोल्टने एकाच ओव्हरमध्ये घेतले 2 बळी