ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग (Boxing) आणि वेटलिफ्टिंग (Weightlifting) हे देखील भारताच्या दृष्टिकोनातून खूप खास खेळ आहेत. या खेळांमध्ये भारत नेहमीच पदकाच्या आशेने मैदानात उतरतो. परंतु, या क्रीडा महासंघांमध्ये सर्व काही ठीक नसेल, तर त्यांना २०१२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक (Olympics) स्पर्धेतून वगळण्यात येईल. सन २०२८ मध्ये लॉस एंजेलिस (2028 Los Angeles Olympic) येथे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) अध्यक्ष थॉमस बाक यांनी मॉडर्न पेंटॅथलॉनला (Modern Pantathelon) या दोन खेळांव्यतिरिक्त १८ महिन्यांत व्यवस्थापन सुधारण्याचे निर्देश दिले आहेत.
या खेळांचे प्रशासकीय मंडळ नेहमीच समस्या निर्माण करतात, असे बाक म्हणाले. या खेळांमधील नेतृत्वाशी संबंधित समस्या आणि भ्रष्टाचार आणि डोपिंगच्या मुद्द्यांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. मॉडर्न पेंटाथलॉनला आयओसीने अश्वारोहण स्पर्धा काढून टाकण्यास सांगितले आहे, ज्यावर खेळाडूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. भारताने बॉक्सिंग व वेटलिफ्टिंग या खेळामध्ये आत्तापर्यंत एकत्रितरीत्या पाच पदके जिंकली आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य तर लवलिना बोर्गोहेनने बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक जिंकलेले.
ऑलिम्पिक २०२८ च्या वेळापत्रकाच्या प्राथमिक यादीत या तीन खेळांचा समावेश करण्यात आलेला नाही. हा कार्यक्रम फेब्रुवारीमध्ये आयओसी सदस्यांसमोर मंजुरीसाठी ठेवला जाईल. यादीमध्ये स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लाइंबिंगचा समावेश आहे. या तीन खेळांचा प्रथमच टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) समावेश करण्यात आला होता.
हे खेळ त्यांना भविष्यातील ऑलिम्पिक प्रसारण उत्पन्न मिळविण्यासाठी देखील पात्र ठरेल, जे प्रति गेम किमान १५ दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे. वगळलेल्या तीन खेळांना अजूनही या यादीत स्थान मिळण्याची संधी असेल. बाक म्हणाले की, त्यांना त्यांच्या खेळाच्या प्रशासनात आणि संघटनात्मक संस्कृतीत बदल करून आयओसी कार्यकारी मंडळाच्या सदस्यांचे समाधान करायचे आहे.
फुटबॉलला लॉस एंजेलिसच्या ऑलिम्पिकमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. परंतु दर चार वर्षांच्या ऐवजी दर दोन वर्षांनी विश्वचषक आयोजित करण्याच्या योजनेमुळे बाक यांनी फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफा (FIFA) ला नोटीस दिली आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमुळे या स्पर्धेची थेट लढत लॉस एंजेलिस ऑलिम्पिकशी होणार आहे.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympic 2024) च्या आयोजकांनी बेसबॉल, सॉफ्टबॉल आणि कराटेसाठी विनंती केलेली नाही.पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लाइंबिंग तसेच ब्रेकडान्सिंगचा समावेश असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल ११५६ गडी बाद करणारे ‘दिग्गज’ अँडरसन-ब्रॉड बनलेत ‘वॉटर बॉय’! सोशल मीडियात होतेय तुफान कौतुक
ओमिक्रॉनच्या सावटाखाली ‘इतके’ दिवस ‘टीम इंडिया’ राहणार दक्षिण आफ्रिकेत; ‘या’ दिवशी होणार रवाना