नवी दिल्ली। आयपीएलच्या 13 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघ काही संघांपैकी एक आहे जो या हंगामात जेतेपद जिंकण्यासाठी दावेदार आहे. सध्या आयपीएलच्या तयारीसंदर्भात सर्व संघ युएईमध्ये पोहोचले आहेत आणि प्रशिक्षणात भाग घेत आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाची सर्वात मोठी ताकद हे त्याचे युवा खेळाडू आहेत आणि त्यास बळकटी देण्यासाठी या वेळी दिल्लीच्या संघात युवा जलदगती गोलंदाज तुषार देशपांडेदेखील सामील झाला आहे.
तुषार देशपांडे याच्याबद्दल बोलायचे झाले तर, मुंबई संघातून घरगुती क्रिकेट खेळणारा हा खेळाडू खूपच हुशार असून रणजीमध्ये त्याने 20 सामन्यांत 50 बळी घेतले आहेत.
तुषार देशपांडे म्हणाला की, “आयपीएल 2020 मध्ये कागिसो रबाडा आणि इशांत शर्मा यासारख्या अनुभवी खेळाडूंकडून आपल्याला बरेच काही शिकायचे आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या संघात आणखी एक युवा खेळाडू ललित यादवही आहे ज्याला आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंच्या यादीत सामील व्हायचे आहे.”
दुबईतील आयसीसी अॅकॅडमीमध्ये सराव सत्रादरम्यान या दोन्ही खेळाडूंनी लीगवर भाष्य केले आणि आपली मते मांडली.
देशपांडे म्हणाला, “हा माझा पहिला आयपीएल हंगाम आहे, त्यामुळे तो नेहमीच खास असेल. मला सर्वात जास्त आवडत असलेली गोष्ट म्हणजे गोलंदाजी करणे. मी जवळपास सहा महिन्यांनंतर गोलंदाजी करत आहे म्हणून हे एक वेगळे आव्हान आहे.”
बहुतेक खेळाडूंना आयपीएल खेळण्याचा अनुभव आहे
तो म्हणाला, “संघातील सर्व गोलंदाजांना आयपीएलचा अनुभव आहे आणि ते माझे सर्व वरिष्ठ आहेत. इशांत आणि रबाडासारखे लोक पहिल्यांदाच लीगचा भाग असलेल्या माझ्यासारख्या गोलंदाजांना उपयुक्त ठरेल.”
त्याचबरोबर, मधल्या फळीत मोठे फटके लगावण्यासाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज ललित यादवचा असा विश्वास आहे की तो आपल्या सुधारित फिरकी गोलंदाजीमुळे संघाला फायदा करू शकेल आणि युवा खेळाडूंसाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएलमधील एक उत्तम व्यासपीठ आहे.
दिल्ली संघ युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो
हे लक्षात घेण्यासारखे आहे की ललित यादवने घरगुती क्रिकेटमध्ये 30 टी20 सामन्यांत 136 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
तो म्हणाला, “दिल्ली कॅपिटल्स तरुणांना संधी देण्यासाठी प्रसिध्द आहे. आमच्या संघात याची अनेक उदाहरणे आहेत. आमचा कर्णधार श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांच्या कलागुणांना दिल्ली संघाने ओळखले. तर माझ्यासाठी ही नक्कीच योग्य संधी आहे. त्यांनी केलेल्या कामगिरीप्रमाणे मला भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या दिशेने जायचे आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-“विराट कोहली हा भारतीय आहे म्हणून त्याचे कौतुक करणं थांबवू?” माजी वेगवान गोलंदाज कडाडला
-आयपीएलच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा कायम; ब्रिजेश पटेल यांनी सांगितली नवी तारीख
-बॅट दुरुस्त केलेल्या अशरफ चाचांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर आला पुढे; केली ‘ही’ मदत
ट्रेंडिंग लेख-
-…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली
-बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या
-आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले ३ खेळाडू; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही