2008 साली इंडियन प्रीमीयर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आज ही स्पर्धा टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक मानली जाते. या स्पर्धेला जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. यास्पर्धेत अनेक देशांतील स्टार क्रिकेटपटू खेळतात. या स्पर्धेचे सर्वात पहिले जेतेपद राजस्थान रॉयल्सने मिळवले होते. हे विजेतेपद माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली मिळाले होते. 2008 मध्ये या संघाकडे पाहून, आयपीएल चे विजेतेपद जिंकेल असे कधीच कुणाला वाटले नव्हते. परंतु शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने कोणालाही अपेक्षा नसताना शानदार कामगिरी बजावली आणि विजेतेपदावरही नाव कोरले. वास्तविक पाहता राजस्थान रॉयल्सचा संघ सर्वात स्वस्त संघ होता.
राजस्थान रॉयल्सचा सुरुवातीचा प्रवास चांगला झाला नव्हता. पहिल्याच सामन्यात त्यांना दिल्ली डेअरडेविल्स बरोबरच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण यानंतर त्यांनी सलग पाच सामने जिंकले. 2008 च्या संपूर्ण हंगामात 16 सामने खेळणार्या राजस्थानने केवळ तीन सामने गमविले होते.
पहिल्या सामन्यात राजस्थानला पराभूत करणारा दिल्ली उपांत्य फेरीतही त्यांच्या समोर होता. यावेळी मात्र राजस्थानने हा सामना एकतर्फी जिंकला. शेन वॉटसनच्या 52 आणि युसुफ पठाणच्या 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली 87 धावांवर सर्वबाद झाली.
अंतिम सामन्यात राजस्थानचा सामना एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जशी झाला. अंतिम सामन्यात सुरेश रैनाचे 43, पार्थिव पटेलचे 38 आणि कर्णधार धोनीच्या नाबाद 29 धावांच्या जोरावर चेन्नईने 5 बाद 163 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स संघाने सात गडी गमावून 164 धावा केल्या आणि आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर करुन घेतले.
आयपीएलचा पहिला हंगामही यासाठीही विशेष मानला जातो ती या हंगामात पाकिस्तानी खेळाडूदेखील आयपीएलचा भाग होते. राजस्थानकडून खेळणाऱ्या पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरने 22 बळी घेत ‘पर्पल कॅप’ मिळवली होती. त्याचवेळी किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने 616 धावा काढत ऑरेंज कॅप पटकावली होती. या हंगामानंतर भारत-पाकिस्तान मधील तणावामुळे पाकिस्तानी खेळाडू कधीही आयपीएलमध्ये सहभागी झाले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई सुपरकिंग्सचा हा दिग्गज खेळाडू दुसऱ्यांदा झाला पिता
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी बदलला जाणार आयपीएलचा नियम?
विराटच्या आरसीबीसेनेचा प्लॅन तयार; ‘या’ दिवशी होणार यूएईला रवाना
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलचे ५ परदेशी स्टार क्रिकेटर, जे सध्या खेळत आहेत कॅरेबियन प्रीमियर लीग
देशाकडून एकही सामना न खेळण्याची संधी मिळालेले ५ महान क्रिकेटर
५ क्रिकेटर ज्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर पुन्हा केले होते कमबॅक, परंतू झाले सुपर फ्लॉप