हैद्राबाद। आज(12 मे) आयपीएल 2019 मध्ये अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी चेन्नईच्या 11 जणांच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर मुंबई इंडियन्सने एक बदल केला आहे. त्यांनी जयंत यादवच्या ऐवजी मिशेल मॅकक्लेनाघनला 11 जणांच्या संघात संधी दिली आहे.
या सामन्यात विजय मिळवून चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करणार आहेत. आत्तापर्यंत या दोन्ही संघांनी प्रत्येकी 3 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.
तसेच आयपीएल इतिहासात चौथ्यांदा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात अंतिम सामना होत आहे. याआधी 2010, 2013 आणि 2015 च्या आयपीएल मोसमात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स अंतिम सामन्यात आमने सामने आले आहेत. यामध्ये मुंबईने 2013 आणि 2015 मध्ये तर चेन्नईने 2010ला बाजी मारली आहे.
असे आहेत 11 जणांचे संघ –
चेन्नई सुपर किंग्स – फॅफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, इम्रान ताहिर.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, कृणाल पंड्या, हर्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड, राहुल चहर, मिशेल मॅकक्लेनाघन, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स आणि अंतिम सामना, असे आहे खास नाते…
–पराभवानंतरही श्रेयस अय्यरने जिंकली मने; धोनी, कोहली, रोहितबद्दल केले मोठे भाष्य
–Video: मजेदार! एकाच दिशेला पळाले वॉटसन-डुप्लेसिस, दिल्लीने गमावल्या रनआऊटच्या संधी