आयपीएलच्या १३ व्या सत्रातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी ४ वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्स संघ आणि ३ वेळा चॅम्पियन ठरलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ यांच्यात होणार आहे. स्टेडियममध्ये गर्दी नसतानाही यावेळेस आपल्याला एक रोमांचक आयपीएल सामने पाहायला मिळतील. कारण मागील हंगामाप्रमाणेच या आयपीएल हंगामातही बरेच दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील.
आयपीएलमध्ये फिनिशर्सची भूमिका देखील खूप महत्वाची आहे आणि या हंगामातही बरेच खेळाडू या भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतात. सामन्यात अष्टपैलू खेळाडू बहुधा फिनिशर्सची भूमिका बजावताना दिसतात आणि आयपीएलच्या या हंगामात बरेच अष्टपैलू खेळत आहेत. ते खेळाडू त्यांच्या संघांसाठी नक्कीच फिनिशरची भूमिका साकारतील.
या लेखात अशा ३ अष्टपैलू खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, जे आयपीएलच्या या हंगामात सर्वोत्कृष्ट फिनिशर असल्याचे सिद्ध होऊ शकतात. यातील एक खेळाडू आयपीएलमध्ये पुन्हा पदार्पण करत आहे. तर दोन अष्टपैलू आयपीएलमध्ये मागील काही सत्रांपासून सातत्याने खेळत आहेत. तर मग जाणून घेऊया ते ३ खेळाडू कोण आहेत?
आयपीएलच्या या हंगामात सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून कामगिरी निभावत हे ३ अष्टपैलू खेळाडू.
३. जिमी नीशम – किंग्ज इलेव्हन पंजाब
न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी नीशम ६ वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतणार आहे. या मोसमात तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघामध्ये सहभागी आहे. यापूर्वी तो आयपीएलमध्ये २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. २०१४ च्या आयपीएल हंगामात नीशमने केवळ चार सामने खेळले. नीशमने आयपीएलमध्ये पदार्पण केले तेव्हा तो अवघ्या २३ वर्षांचा होता. पण आता त्याचा अनुभव त्याला उपयोगी पडू शकतो.
स्वत: जिमी नीशमने म्हटले आहे की जेव्हा मी आयपीएलमध्ये आलो तेव्हा फारसे वय नव्हते परंतु आता माझ्याकडे अनुभव आहे. हेच कारण आहे की तो किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारू शकतो आणि फिनिशर म्हणून स्वतःला सिद्ध करू शकतो.
२. हार्दिक पंड्या – मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या लांब षटकारांसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये त्याने मुंबई संघासाठी अनेक वेळा जलद गतीने धावा केल्या आहेत. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत याने फिनिशर म्हणून बऱ्याचदा कामगिरी केली आहे. तसेच त्याने गोलंदाजीतही उत्तम कामगिरी केली आहे.
हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सला बरेच सामने जिंकून दिले आहेत. या मोसमातही तो जबरदस्त कामगिरी करू शकतो. पंड्या बऱ्याच दिवसानंतर मैदानात परतणार आहे. या मोसमात तो स्वतःला सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून सिद्ध करण्यास तयार असेल.
१. ख्रिस मॉरिस – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
या आयपीएल हंगामातील लिलावात आरसीबीने ख्रिस मॉरिसला १० कोटींच्या प्रचंड रकमेवर विकत घेतले. तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो गोलंदाजी व्यतिरिक्त फलंदाजीही करतो. संघाला गरज भासल्यास तो आपल्या फलंदाजीने एकहाती सामना जिंकू शकतो.
ख्रिस मॉरिसचा आयपीएलमध्येही बराच अनुभव आहे आणि आरसीबीसाठी या मोसमात त्याची भूमिका खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या आयपीएल हंगामात ख्रिस मॉरिस बेंगलोरसाठी फिनिशरची भूमिका बजावू शकतो.