कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२० स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. स्पर्धेचे सामने युएईमधील तीन शहरांत होणार आहे.
आयपीएलची घोषणा झाल्याबरोबर आता खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे. आयपीएलमधील असेही काही संघ आहेत ज्यात परदेशी खेळाडू खूप महत्वाची भूमिका बजावतात. काही संघांसाठी या हंगामातही परदेशी खेळाडूंची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण असेल. प्रत्येक संघ त्या खेळाडूंवर खूप अवलंबून आहे..
या लेखात त्या ३ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांचा फॉर्म आयपीएल २०२० मध्ये संघाची दिशा निश्चित करेल. हे खेळाडू यापूर्वी या लीगमध्येही खेळले आहेत. पण या हंगामात प्रत्येक खेळाडूच्या खेळावर नजर असेल.
१. बेन स्टोक्स
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सचा सध्याचा फॉर्म पाहता त्याचा आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स सर्वात जास्त खूष असेल. आतापर्यंत स्टोक्सने राजस्थान रॉयल्स संघासाठी फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. राजस्थान रॉयल्स संघासाठी परदेशी खेळाडूंमधील जोस बटलरने गेल्या दोन मोसमात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. पण आता जर त्याला बेन स्टोक्सची साथ मिळाली तर संघ जेतेपद जिंकण्याच्या अगदी जवळ असेल.
आयपीएलमध्ये बेन स्टोक्सने आतापर्यंत ३४ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २२.६८ च्या सरासरीने ६३५ धावा केल्या आहेत. दरम्यान स्टोक्सचा स्ट्राइक रेट १३२.०२ आहे. स्टोक्सने गोलंदाजीत ३१.०८ च्या सरासरीने २६ विकेट्स घेतल्या आहेत.
२. ऑयन मोर्गन
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने पुन्हा एकदा या लिलावात इंग्लंडचा ओएन मोर्गनला आपल्या संघात सामील करून घेतलं आहे. ऑयन मोर्गन यापूर्वीही कोलकाता संघाचाच एक भाग होता. पण यावेळी त्याच्याकडून विशेष अपेक्षा असेल.
दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात कोलकाता संघाच्या काही उणिवा गेल्या मोसमात दिसून आल्या. आंद्रे रसेलशिवाय कोणीही मधल्या फळीत जबाबदारीने खेळत नव्हता. आता जर मोर्गन या वेळी मधल्या फळीत खेळून चांगली कामगिरी करत असेल तर विजेतेपद जिंकण्याची शक्यता वाढेल.
मोर्गन आतापर्यंत आयपीएलमध्ये ५२ सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने २१.३५ च्या सरासरीने ८५४ धावा केल्या आहेत. ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान, मोर्गनचा स्ट्राइक रेट १२१.१३ आहे. मॉर्गनची सर्वोत्तम धावा ६६ धावा आहे.
३. ख्रिस मॉरिस
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू ख्रिस मॉरिस याला, या वेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने मोठ्या प्रमाणात पैसे लावून आपल्या संघात घेतले आहे. डेथ ओव्हर्समध्ये मॉरिसने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तसेच डेथ ओव्हर्समध्ये बेंगलोर संघातील गोलंदाज फारसे चांगले कामगिरी करू शकले नव्हते, त्यामुळे आता मॉरीस बेंगलोरसाठी महत्त्वाचा गोलंदाज ठरु शकतो.
मॉरिसने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६१ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २७.२१ च्या सरासरीने ५१७ धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याचा स्ट्राइक रेट १५७.६ २ आहे. गोलंदाजीत मॉरिसने २४.७७ च्या सरासरीने ६९ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ७- हेडनची पर्थच्या मैदानावर कसोटीतील वनडे स्टाईल फटकेबाजी
आपल्या देशासाठी जखम झालेलं स्वत:चं बोट कापायलाही तयार झालेला क्रिकेटर
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-२ फलंदाज, ज्यांनी धोनी, विराट आणि रोहितलाही टाकलयं मागं