आयपीएल २०२० चे आयोजन यावर्षी भारतात होणार नसून यूएईत १९ सप्टेंबरपासून होणार आहे. यूएईतील वातावरण फिरकीपटूंसाठी चांगले समजले जाते. त्यामुळे आता यावर्षी आयपीएलमध्ये अधिक विकेट्स घेण्यासाठी मैदानावर खेळाडूंमध्ये स्पर्धा दिसण्याची आशा आहे.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने यावर्षीच्या आयपीएलमध्ये ६ सर्वोत्तम फिरकीपटूंची निवड केली आहे. यामध्ये त्याने ६ व्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमानला निवडले आहे. तो आयपीएलच्या या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचे संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. त्यानंतर त्याने ५ व्या क्रमांकासाठी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फिरकीपटू इम्रान ताहिरची निवड केली आहे. तो नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे.
अश्विनला ठेवले ४थ्या क्रमांकावर
चोप्राने म्हटले की, “६ व्या क्रमांकावर मी मुजीब उर रहमानची निवड करत आहे. त्याच्याकडे २ किंवा ३ चांगले बदल आहेत. तो नव्या चेंडूने मधल्या षटकांमध्येही चांगली गोलंदाजी करतो. ५व्या क्रमांकावर मी अनेक कारणांमुळे इम्रान ताहिरची निवड करत आहे. सर्वप्रथम तो टी२० क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करतो. धोनी त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेईल.”
चोप्राने ४थ्या क्रमांकासाठी आर अश्विनची निवड केली आहे. अनुभवी फिरकीपटू अश्विनला खूप साऱ्या गोष्टींसाठी ओळखले जाते. चोप्राने म्हटले की, “अश्विनकडे खूप अनुभव आहे, त्याच्याकडे एक सामान्य ऑफ स्पिन आणि कॅरम चेंडू आहे तसेच मधे-मधे तो गुगली करतो. परंतु मला सर्वाधिक आवडला तो म्हणजे त्याचा स्वभाव.”
अव्वल ३ फिरकीपटूंमध्ये युझवेंद्र चहलचाही समावेश
तिसऱ्या क्रमांकावर चोप्राने वेस्ट इंडिजचा टी२० तज्ज्ञ फिरकीपटू सुनिल नरेनची निवड केली आहे. त्रिनिदादचा हा खेळाडू आपल्या आयपीएल प्रवासाच्या सुरुवातीपासूनच कोलकाता नाईट रायडर्स संघाशी जोडला आहे. चोप्राने म्हटले की, “तिसऱ्या क्रमांकावर मी सुनिल नरेनची निवड करत आहे. त्याच्या फॉर्ममध्ये थोडा बदल झाला आहे. त्यामुळे जर दिनेश कार्तिकने त्याचा चांगला वापर केला, तर हा खेळाडू खूप चांगली कामगिरी करेल आणि केकेआरला विजय मिळवून देईल.”
माजी क्रिकेटपटू चोप्राने पुढे म्हटले की, अव्वल २ स्थानांवर जवळपास अटीतटीची स्पर्धा होती. आणि त्याने दुसऱ्या क्रमांकासाठी युझवेंद्र चहलची निवड करत त्याची प्रशंसा केली आहे. तो म्हणाला, “दोन्ही फिरकीपटूंमध्ये खूपच स्पर्धा आहे. परंतु मी दुसऱ्या क्रमांकावर चहलची निवड करत आहे. त्याचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे त्याची बुद्धी आहे. तो आपल्या बुद्धीने फलंदाजांना बाद करतो. यासोबतच मोठ- मोठी मैदानांवर त्याला मदत मिळेल.”
कुलदीपला ठेवले बाहेर
चोप्राने याचाही उल्लेख केला की, त्याने कुलदीप यादवला मागील हंगामातील खराब कामगिरीमुळे निवडले नाही. तो म्हणाला, “कुलदीप यादवचाही यामध्ये समावेश झाला असता. परंतु त्याने मागील आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली नव्हती.”
सर्वोत्तम ६ फिरकीपटूंमध्ये त्याने अव्वल क्रमांकावर राशिद खानला निवडले. तो या हंगामात सनरायझर्स हैद्राबाद संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तो भुवनेश्वर कुमारनंतर हैद्राबादसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने ४६ सामन्यांमध्ये ५५ विकेट्स घेतल्या आहेत. ज्यांमध्ये त्याची सरासरी २१ आणि प्रति षटक रन रेट ६.५५ आहे.
अफगाणिस्तानचा वाघ राशिदला सांगितले अव्वल फिरकीपटू
चोप्राने म्हटले की, “अव्वल क्रमांकावर मी अफगाणिस्तानचा वाघ राशिद खानला निवडले आहे. मी त्याला २-३ कारणांमुळे अव्वल क्रमांकावर ठेवले आहे. तरीही आपण मागील हंगामातही पाहिले होते की, फलंदाजांना त्याची गोलंदाजी थोडीफार समजली होती. परंतु तो सीपीएलमध्ये खेळल्यानंतर आयपीएलमध्ये पाऊल ठेवणार आहे. त्यासाठी तो आयपीएलमध्ये मैदानात उतरणार आहे. तो एक नवीन शैली विकसित करत आहे.”
ट्रेंडिंग लेख-
-पंतप्रधानाच्या हत्येमुळे भारतीय संघाला सोडावा लागला पाकिस्तान दौरा अर्ध्यावर
-जेव्हा एका कैद्याच्या समर्थनार्थ चक्क खेळपट्टीवर खड्डे करून भरण्यात आले होते तेल…
-किचनमधील धुरामुळे झाला होता राडा, चालू क्रिकेट सामन्यात अग्निशामक दल घुसले मैदानात
महत्त्वाच्या बातम्या-
-क्रिकेटमध्ये चुकीच्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला केकेआरचा कर्णधार म्हणतो योग्य, पण…
-‘हा’ दिग्गज ऑस्ट्रेलियन झाला दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक; करणार पाँटिंग, कैफसह कोचिंग
-चाहत्यांना पराभव लागला जिव्हारी; पेटवून दिली कार, १४८ जणांना झाली अटक