आयपीएल २०२० चा ३८ वा सामना मंगळवारी (२० ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्लीने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रथम फलंदाज करताना ५ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब संघाचा धडाकेबाज फलंदाज मयंक अगरवाल संघसहकारी निकोलस पूरनच्या चुकीमुळे धावबाद झाला. त्यामुळे पंजाबला मोठा फटका बसला.
झाले असे की, दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाजीला केएल राहुल आणि मयंक अगरवाल मैदानावर उतरले होते. यावेळी राहुल चांगली फटकेबाजी करत होता. परंतु तो १५ धावा करत झेलबाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेला ख्रिस गेलही १३ चेंडूत २९ धावा करत पव्हेलियनला परतला. हे षटक आर अश्विन टाकत होता. त्याचवेळी फलंदाजीला आलेल्या पूरनने अश्विनच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला.
त्यानंतर त्याने अश्विनच्या पाचव्या चेंडूवर फटका मारला. आणि धाव घेण्यासाठी मयंकला इशारा दिला. त्यावेळी मयंकने त्याला नको म्हटले असता तो तसाच पुढे पळाला, त्यामुळे मयंकनेही पुढे धाव घेतली. मयंक जोराने वरच्या बाजूला धावला. परंतु अश्विनने जोरात चेंडू यष्टीरक्षक रिषभ पंतकडे फेकला आणि पंतने मयंकला धावबाद केले. याठिकाणी योग्य संपर्क न साधल्यामुळे मयंक बाद झाला.
त्यामुळे ९ चेंडू खेळत केवळ ५ धावांवर तो पव्हेलियनमध्ये परतला.
https://twitter.com/watsonmpaul/status/1318589479771308039
पंजाब संघाने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी केवळ ३ सामने जिंकले आहेत. दिल्लीविरुद्ध १० वा सामना जिंकून ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील.
महत्त्वाच्या बातम्या-
-हमसे पंगा पडेगा मेहंगा! चौकार मार म्हणून खोड काढणाऱ्या अख्तरला सेहवागचा जबरा पलटवार
-शिखर ‘द वन’..! सलग २ सामन्यात शतक ठोकत घडवला इतिहास
-नेमकं चाललंय तरी काय! करोडो रुपये देऊन संघात घेतलेले खेळाडूच ठरले सपशेल फ्लॉप
ट्रेंडिंग लेख-
-ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
-HBD विरू : तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं ! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’
-क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले