इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलला सुरुवात होऊन आतापर्यंत १२ वर्षे झाली आहेत. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलच्या विजेतेपदावर आपले नाव कोरता आलेले नाही. आरसीबी संघ प्रत्येक हंगामात स्टार खेळाडूंसोबत मैदानावर उतरतो. परंतु त्यांना यश मात्र मिळत नाही.
१९ सप्टेंबर पासून आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होईल. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात हा संघ यंदा आपले स्वप्न साकार करायला मैदानात उतरेल.
या लेखात आपण चर्चा करणार आहोत त्या ३ खेळाडूंची जे आयपीएल चषकाचे स्वप्न पूर्ण करतील. बेंगलोरचा पहिला सामना २१ सप्टेंबर २०२० ला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.
आयपीएल २०२० मधील आरसीबीचे हे ३ धुरंदर खेळाडू
विराट कोहली (Virat Kohli)
भारताचा कर्णधार ‘रनमशीन’ विराट कोहली हा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेही नेतृत्व करत असून तो प्रमुख फलंदाज आहे. विराट सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. विराटने आयपीलमध्ये १७७ सामन्यात ३७.८४ च्या सरासरीने ५४१२ धावा काढल्या आहेत. आरसीबी संघासाठी एकहाती सामना जिंकण्याची क्षमता त्याच्यात आहे. तो आपल्या खेळीने आरसीबीला विजेतेपद जिंकून देऊ शकतो. या हंगामात तो कर्णधार म्हणून आपल्या संघाचे आणि त्याचे आयपीएल चषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करु शकतो.
एबी डिविलियर्स (AB de Villiers)
एबी डिविलियर्स आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. त्याने आयपीएल मध्ये २०११ पासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कडून खेळण्यास सुरुवात केली. त्याने आयपीएलमध्ये केवळ २१ चेंडूत अर्धशतक ठोकले आहे.
आतापर्यंत आरसीबीकडून १२६ सामने खेळले असून त्यात त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके झळकावत ३७२४ धावा केल्या आहेत. तसेच संपूर्ण आयपीएल स्पर्धेत १५४ सामन्यात ४३९५ धावा केल्या आहेत. त्यात ३३ अर्धशतके तर ३ शतकी खेळ्या साकारल्या आहेत. त्याने आयपीएल स्पर्धेत २१२ षटकार ठोकले आहेत. नेहमी आपल्या बॅटने मोठमोठे शॉट्स मारणारा डिविलियर्स आयपीएल २०२० मध्ये दमदार फलंदाजी करून संघाला आयपीएल विजेता बनवू शकेल.
युजवेंद्र चहल (Yujvendra Chahal)
चहलने आपल्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्समधून केली होती. आयपीएलच्या तीन सत्रात तो फक्त इंडियन्सकडून खेळला होता. २०१४ च्या आयपीएल खेळाडूंच्या लिलावामध्ये चहलला रॉयल चॅलेंजर्सने त्याची मुळ किंमत रु. १० लाखात खरेदी केले होते. परंतु आज तो आरसीबी फ्रेंचायझीचा एक महत्वाचा खेळाडू बनला आहे.
त्याने आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत ८४ सामने खेळले असून त्यात त्याने १०० बळींचा आकडा गाठला आहे. यात त्याची सर्वोच्च कामगिरी ४/२५ अशी आहे. कोरोना विषाणूमुळे यंदा हि स्पर्धा भारताबाहेर म्हणजे यूएईमध्ये होणार आहे. यूएईमधील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना उपयुक्त अशी आहे. याचा फायदा घेत चहल जबरदस्त कामगिरी करू शकतो.
असं असेल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे आयपीएल १३ व्या हंगामातील सामान्यांचे वेळापत्रक-
२१ सप्टेंबर २०२०
विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
२४ सप्टेंबर २०२०
विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
२८ सप्टेंबर २०२०
विरुद्ध मुंबई इंडियन्स
३ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध राजस्थान रॉयल्स
५ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध दिल्ली कॅपिटल
१० ऑक्टोबर २०२०
विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
१२ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
१५ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
१७ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२१ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२५ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
२८ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध मुंबई इंडियन्स
३१ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
२ नोव्हेंबर २०२०
विरुद्ध दिल्ली कॅपिटल
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ-
विराट कोहली (कर्णधार), आरोन फिंच, एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, युझवेंद्र चहल, डेल स्टेन, केन रिचर्डसन, नवदीप सैनी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, मोईन अली, जोश फिलिप , पवन देशपांडे, शाहबाज अहमद, इसुरु उदाना, देवदत्त पाडीक्कल आणि गुरकीरत सिंग