नवी दिल्ली| आयपीएल 2020 मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने आपल्या संघासाठी एक मोठा आणि अत्यंत धाडसी निर्णय घेतला आहे. त्याच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आयपीएल 2020 मध्ये 19 सप्टेंबरला पहिला सामना खेळण्याऐवजी चेन्नई सुपर किंग्सकडे 23 सप्टेंबरपासून आपली मोहीम सुरू करण्याचा पर्याय होता.
इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सीएसकेला या हंगामातील आयपीएलचा 5 वा सामना खेळण्याचा पर्याय दिला होता. म्हणजे संघामध्ये तयारीसाठी आणि सध्या सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सीएसकेला अधिक वेळ मिळेल. पण कर्णधार धोनीने हा प्रस्ताव नाकारला.
मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळण्याचा निवडला पर्याय
आयपीएलच्या पहिल्या दिवशी धोनीने मुंबई इंडियन्सविरूद्ध सीएसकेची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्याने सांगितले की, “वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी आम्ही सीएसकेशी बोललो होतो. आम्ही नंतर सीएसकेचा पहिला सामना करू शकलो असतो पण त्यांना फक्त सलामीचा सामना खेळायचा होता.”
एवढेच नव्हे तर सर्व समस्यांच्या विपरीत धोनी आणि सीएसके यांनी लीगच्या पहिल्या 6 दिवसात 3 सामने खेळावे लागण्याच्या वेळापत्रकाची निवड केली. पहिल्या आठवड्यातच 3 सामने खेळणारा सीएसके हा एकमेव संघ आहे.
पहिल्या आठवड्यात सीएसके मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सशी खेळेल. त्यांना विश्वास आहे की सलामीच्या सामन्याआधी ते सर्व त्रासातून मुक्त होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
यंदा ‘ही’ धावसंख्या आयपीएलमध्ये ठरणार आव्हानात्मक; या दिग्गजाचा दावा
इंग्लंडला मिळाला १० वा टी२० कर्णधार, मॉर्गन ऐवजी या खेळाडूने केले नेतृत्व
…म्हणूनच चेतेश्वर पुजाराला आयपीएल लिलावात खरेदीदार न मिळण्याचे दु:ख नाही
ट्रेंडिंग लेख –
३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध
आयपीएल संघांची चिंता वाढली; टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे हे ५ खेळाडू झाले फ्लॉप
रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे