नवी दिल्ली। आयपीएलमध्ये जो खेळाडू सर्वाधिक धावा करतो त्याला ‘ऑरेंज कॅप’ दिली जाते, तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला ‘पर्पल कॅप’ दिली जाते. परंतु दिल्ली कॅपिटल्स संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनचे असे मत आहे की, जोपर्यंत खेळाडू संघासाठी आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडत नाही, तोपर्यंत ‘पर्पल’ किंवा ‘ऑरेंज’ कॅप जिंकणे निरर्थक आहे.
अश्विनला त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एका चाहत्याने स्ट्राईक रेटशी संबंधित प्रश्न विचारला होता. त्यावर प्रत्युत्तर देत अश्विन म्हणाला, “यांसारख्या संख्येने काही फरक पडत नाही. पर्पल आणि ऑरेंज कॅप डोळ्यात धूळ फेकल्यासारखे आहे. हे संघाच्या विजयात आपले योगदान देण्याशी संबंधित आहे.” हॅलो दुबईया नावाने अश्विनचा यूट्यूबवरील हा शो तमिळ भाषेत आहे. यात इंग्रजीमध्ये सबटायटल दिले आहेत.
यानंतर अश्विनने एक उदाहरण दिले की, कशाप्रकारे कठीण परिस्थितीत बचावात्मक शॉट खेळणे आवश्यक असते. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे प्रदर्शन विश्लेषक प्रसन्ना एगोरम यांच्यासोबत चर्चा करताना त्याने म्हटले, “जर तुमचे ९ विकेट पडले आहेत आणि तुम्हाला १० धावा करायच्या आहेत, तेव्हा तुम्ही १९ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बचावात्मक शॉट खेळू शकता. हे संघ्याच्या आवश्यकतेनुसार आहे.”
अश्विनचा असा विश्वास आहे की, खेळाचे विश्लेषण, टीका व कौतूक हातात हात घालून चालतात. यांना एकत्र पाहण्यात काही मजा नाही. तो म्हणाला, “खेळाचा आनंद घ्या व चांगला खेळ पाहा.”
दिल्ली कॅपिटल्स संघ १० गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली संघाने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांपैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर उर्वरित २ सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. दिल्लीचा रन रेट हा +१.०३८ आहे.
दिल्ली संघ बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुबई येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळत आहे. आयपीएल २०२० मध्ये दिल्ली आणि राजस्थान रॉयल्स संघाचा हा दुसरा सामना आहे. यापूर्वीच्या सामन्यात दिल्लीने राजस्थानला ४६ धावांनी पराभूत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिंचला मंकडींगने बाद न करण्याचे कारण आले समोर; स्वत: अश्विनने केला खुलासा
-गुपीत आले समोर! अश्विनने जर्सीचा नंबर अचानक केला होता ९९९ वरून ९९, जाणून घ्या कारण
-अश्विनने दाखवली फिंचला मकंडिंग करण्याची भीती, पाहा प्रशिक्षक पाँटिंगची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
-दिल्लीला आयपीएल चषक जिंकायचा असेल, तर ‘या’ ३ गोष्टींकडे द्यावे लागले लक्ष
-असे ३ खेळाडू ज्यांना किंग्ज इलेव्हन पंजाबने अंतिम ११ जणांच्या संघातून वगळले पाहिजे
-IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत