आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 39 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. अबू धाबी येथे आज(21 ऑक्टोबर) रात्री 7.30 वाजता हा सामना खेळला जाईल. गुणतालिकेत अव्वल 4 संघांमध्ये टिकून राहण्याची या दोन्ही संघांकडे संधी आहे. जर आरसीबीने सामना जिंकला तर हा संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे.
मागील सामन्यात बेंगलोरने कोलकाताचा केला होता पराभव
आरसीबी सध्या 9 पैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत तिसर्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी केकेआरने 9 पैकी 5 सामने जिंकून चौथे स्थान कायम राखले आहे. दोन्ही संघाने खेळलेल्या मागील सामन्यात विजय मिळवला आहे. हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येतील. मागील सामन्यात बेंगलोरने कोलकाताला 82 धावांनी पराभूत केले. शारजाह येथे झालेल्या या सामन्यात आरसीबीने 194 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल केकेआरला केवळ 119 धावा करता आल्या होत्या.
बेंगलोरची मजबूत बाजू
आरसीबीचे प्रथम चार क्रमांकाचे फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. संघासाठी त्यांनी आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक 347 धावा आहेत. गोलंदाजीत फिरकीपटूं युजवेंद्र चहल, वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस, इसुरू उदाना आणि युवा फिरकीपटूं वॉशिंग्टन सुंदर चांगली गोलंदाजी करत आहेत. चहलने आतापर्यंत 13 बळी घेतले आहेत.
कोलकातासाठी फलंदाजी आहे चिंतेची बाब
सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार ओएन मॉर्गनशिवाय केकेआर संघात कोणताही फलंदाज फॉर्मात नाही. संघासाठी ही एक चिंतेची बाब आहे. गिलने संघासाठी 9 सामन्यांत 311 धावा आणि मॉर्गनने 248 धावा केल्या आहेत. माजी कर्णधार दिनेश कार्तिक (141) आणि नितीश राणा (184) आतापर्यंत धावा करण्यासाठी संघर्ष करत आहेत. संघाच्या गोलंदाजांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावी यांनी सर्वाधिक 7-7 बळी घेतले आहेत.
हवामान अहवाल आणि खेळपट्टीबद्दल माहिती
अबूधाबीतील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ होईल. तापमान 26 ते 34 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील. अबू धाबीमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकेल. खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंना मदत होईल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल. अबूधाबीमधील शेवटच्या 13 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 54% आहे.
या मैदानावर झालेले एकूण टी20 सामने : 13
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 7
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 6
या हंगामात सर्वाधिक धावसंख्या : 195
या हंगामातील सर्वात कमी धावसंख्या : 125
कोलकाताचा विजय मिळवण्याचा दर बेंगलोरपेक्षा आहे अधिक
आयपीएलमध्ये कोलकाताचा विजय मिळवण्याचा दर 52.40% आहे. केकेआरने आतापर्यंत एकूण 187 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 97 सामने जिंकले आहेत आणि 90 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. बेंगलोरचा विजय मिळवण्याचा दर 48.11% आहे. आरसीबीने आतापर्यंत एकूण 190 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 90 सामने जिंकले आहेत आणि 96 सामने गमावले आहेत. 4 सामने अनिर्णीत राहिले.
महत्त्वाच्या बातम्या –
ठरलं ! भारताचा तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना होणार ‘या’ शहरात
बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू
आयपीएल २०२०: दिल्ली विरुद्धच्या विजयानंतर पंजाबची पाचव्या क्रमांकावर उडी; पाहा अशी आहे गुणतालिका
ट्रेंडिंग लेख –
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
HBD विरू : तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं ! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले