नवी दिल्ली। आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान यूएईमध्ये होणार आहे. परंतु यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा झटका बसला आहे. सीएसकेचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकाच संघातील एवढे सारे लोक कोरोना संक्रमित झाल्यानंतर बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, सीएसके संघ आता नियोजित वेळेनुसार खेळतो की नाही पाहावे लागेल.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना गांगुली म्हणाला, “मी सीएसकेच्या सध्याच्या परिस्थितीवर कोणत्याही प्रकारचे विधान करू शकत नाही. सीएसके संघ नियोजित वेळेत खेळतो की नाही हे आम्ही पाहू. मला आशा आहे की आयपीएल २०२०चे आयोजन योग्यप्रकारे पार पडेल. आयपीएलसाठीचे वेळापत्रक मोठे आहे आणि मला आशा आहे की सर्वकाही चांगल्याप्रकारे होईल.”
आयपीएल २०२० मधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात होणार आहे. शुक्रवारी सीएसकेचे १२ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले होते, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज दीपक चाहरचाही समावेश होता. शनिवारी (२९ ऑगस्ट) सीएसकेचा आणखी एक खेळाडू म्हणजेच ऋतुराज गायकवाडही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
विशेष म्हणजे सीएसकेचा अनुभवी फलंदाज सुरेश रैनानेही आयपीएलमधून माघार घेतली आहे. तो यूएईतून भारतात परतला आहे. दैनिक जागरणशी चर्चा करताना त्याने म्हटले की, हा निर्णय कुटुंबाला लक्षात घेऊन घेतला आहे.
बीसीसीआयने शनिवारी या संपूर्ण घटनेबद्दल म्हटले होते की, यूएईमध्ये पोहोचलेल्या आयपीएलशी निगडीत सर्व लोकांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक आहे. २० ते २८ ऑगस्टदरम्यान १९८८ लोकांची चाचणी करण्यात आली होती, ज्यामध्ये १३ लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-दुबई पोहोचल्यानंतर सीएसकेच्या खेळाडूंनी ही गोष्ट केल्याने झाली कोरोनाची लागण?
-जाणून घ्या सीएसकेचा फिरकीपटू हरभजन सिंग कधी होणार दुबईला रवाना
ट्रेंडिंग लेख-
-सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार
-आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे
-तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा