खेळ कोणताही असो, त्यात खेळाडूचे आणि प्रशिक्षकाचा समन्वय चांगला असेल तर खेळाडूच्या कामगिरीत प्रगती झालेली दिसते. असाच समन्वय सध्या मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक झहिर खान आपल्या संघातील युवा खेळाडूंशी साधण्याचा प्रयत्न करत आहे, असेच दिसते. नुकताच झहिरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तो बीडच्या दिग्विजय देशमुखला मराठीत मार्गदर्शन करताना दिसत आहे.
मध्यमगती गोलंदाज असलेला दिग्विजय हा यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्यामुळे तो मुंबई इंडियन्ससह युएईमध्ये असून शेन बॉन्ड आणि झहिर खानकडून मार्गदर्शन घेत आहे. बॉन्ड हा मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की दिग्विजय झहिरशी त्याच्या गोलंदाजी शैलीबद्दल चर्चा करत आहे. त्यावर झहिर त्याला त्याचे पाऊल कसे पडले पाहिजे, त्याची शैली कशी असली पाहिजे, याबद्दल त्याला मार्गदर्शन करत आहे. तसेच एखादा चेंडू टाकायला कसे शिकायचे याबद्दलही तो दिग्विजयला मार्गदर्शन करत आहे. विशेष म्हणजे दिग्विजय आणि झहिर यांची चर्चा मराठीमध्ये चालली होती.
https://www.facebook.com/chandan.pawar.50999/videos/783581212427383
झहिरचे मराठीशी नाते –
झहिरचा जन्म शिर्डीपासून 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्रीरामपूरमध्ये झाला असून त्याचे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. त्याने हिंद सेवा मंडळाच्या मराठी शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले आणि नंतरचे शिक्षण केजे सोमय्या माध्यमिक शाळेतून केले. पुढे क्रिकेट खेळण्यासाठी तो मुंबईत स्थायिक झाला. तसेच त्याने 2017ला सागरिका घाडगे या मराठी अभिनेत्रीबरोबर लग्नही केले आहे.
कोण आहे दिग्विजय –
दिग्विजय हा बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईत जन्मला. त्याला त्याच्या वडीलांनी क्रिकेट क्लबमध्ये दाखल केले होते. त्यावेळी 14 वर्षांचा असताना ‘काय पो छे’ या चित्रपटात काम करण्याची संधी त्याला मिळाली. या चित्रपटात त्याने अली हाश्मी नावाच्या क्रिकेट शिकू इच्छिणाऱ्या मुलाची भूमीका साकारली होती. या चित्रपटानंतरही त्याला अनेकदा चित्रपट, मालिकांमध्ये काम करण्याबद्दल ऑफर आल्या. परंतु त्याने क्रिकेटसाठी त्या सर्व नाकारल्या.
दिग्विजयची 2019-20 च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. त्याने 1 प्रथम श्रेणी सामना खेळला आहे तर 7 अ दर्जाचे सामने आत्तापर्यंत खेळले आहेत. त्याला यंदाच्या आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांच्या किमतीत त्याला संघात सामील करून घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या युवा खेळाडूला रोहित शर्माने दिल्या टिप्स; पहा व्हिडिओ
दिल्लीची गाडी डगमगणार? गोलंदाजांना नडणारा रिषभ पंत ‘इतक्या’ दिवसांसाठी संघाबाहेर
धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीला गुजरातमधून अटक
ट्रेंडिंग लेख –
-बीडमधील आंबेजोगाईचा भीडू आयपीएल गाजवायला झालाय सज्ज
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान