आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांना रविवारी (१९ सप्टेंबरला) यूएईमध्ये सुरुवात. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला असून चेन्नई सुपर किंग्जने या सामन्यात २० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईसाठी महत्वाची खेळी केली ती सलामीवीर ऋतुराज गायकवाडने. पहिल्याच सामन्यात त्याने अर्थशतक पूर्ण केले असून सामना संपल्यानंतर त्याच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल संघ व्यावस्थापन आणि महेंद्रसिंग धोनीचे आभार मानले आहेत.
ऋतुराजने सामन्यात ५८ चेंडूंमध्ये ८८ धावा केल्या आणि नाबाद राहिला. यामध्ये ९ चौकार आणि ४ षटकारांचाही समावेश आहे. त्याच्या या महत्वपूर्ण खेळीमुळे चेन्नई संघ १५६ च्या समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचला. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर त्याने पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार स्वत:च्या नावावर केला.
सामन्यानंतर त्याच्या खेळीविषयी बोलताना ऋतुताज म्हणाला, “जाहिर आहे की, ही माझी आतापर्यांतची सर्वश्रेष्ठ खेळी आहे. सुरुवातीच्या विकेट्स पडल्यामुळे दबावात होतो. जेव्हा सर्व सीनियर्स ड्रेसिंग रूममध्ये माघारी परतले होते, मला फक्त खेळत राहायचे होते आणि संघाला १३०, १४० आणि नंतर १५० पर्यंत पोहचवायचं होत.”
ऋतुराजने त्याच्यावर विश्वास दाखवल्याबद्धल संघ व्यावस्थापन आणि कर्णधार एमएस धोनीचे आभार मानले. तो म्हणाला, “जेव्हा माही भाई तुमच्या सोबत असतात आणि सीएसके व्यावस्थापन तुमच्यावर विश्वास दाखवते, त्यावेळी त्यांनी तुमला समर्थन दिले, तर तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही.”
तो पुढे म्हणाला, “श्रीलंका दौऱ्यावर आणि येथे येऊन केलेल्या तयारीनेही मदत केली. सुरुवातीला चेंडू सीम आणि स्विंग करत होता, त्यामुळे मला फिरकी गोलंदाजांच्या विरोधात संधी घ्यावी लागली. जड्डू आत्ताच खेळपट्टीवर आला होता आणि मला माझ्या संधी शोधायच्या होत्या आणि हे चांगेल राहिले.”
तो म्हणाला, “क्विंटन डाव सांभाळत होता आणि त्यावेळी माझी झेल सोडणे महागात ठरू शकत होते, सुदैवाने दीपकने त्याला लवकर बाद केले”
चेन्नई सुपर किंग्जला सामन्याची सुरुवात चांगली करता आली नाही. पण नंतर ऋतुराज गायकवाडने केलेल्या ८८ धावांच्या खेळीमुळे त्यांनी ६ बाद १५६ धावांपर्यंत मजल मारली आणि मुंबईसमोर विजयासाठी १५७ धावांचे आव्हान ठेवले. पण मुंबईला ८ बाद १३६ धावाच २० षटकांअखेर करता आल्या. त्यामुळे चेन्नईने हा सामना २० धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
वानिंदू हसरंगाचे होऊ शकते आयपीएल पदार्पण, आरसीबीची ‘अशी’ असेल संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’
सूर्यकुमारच्या ‘त्या’ कृत्याचे केले जातेय चाहत्यांकडून कौतुक
बॅटही तुटली अन् विकेटही गमावली, ट्रेंट बोल्टने ‘असे’ केले सुरेश रैनाला बाद; पाहा व्हिडिओ