इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ यावेळी नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत. सीएसकेचा कर्णधार रविंद्र जडेजा आहे, तर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे. या सामन्यात काही खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. या लेखात आपण अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे हंगामाच्या पहिल्या सामन्याची सुरुवात चांगली करताना दिसतील आणि आपल्या कामगिरीने प्रभावित करतील.
१. रविंद्र जडेजा
भारताचा दिग्गज खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सीएसकेची कमान सांभाळताना दिसणार आहे. त्याचे संघात विशेष स्थान असणार आहे. जडेजा फक्त गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीत सुद्धा चांगली कामगिरी करतो. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीने अगोदरच सर्वांना प्रभावित केले आहे. जडेजाने या लीगमध्ये २०० सामन्यांमध्ये २३८६ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने १२७ विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत.
२. श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा या हंगामात केकेआर संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याने या अगोदर दिल्ली संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे या हंगामात त्याच्याकडून फक्त फलंदाज म्हणूनच नाही तर कर्णधार म्हणून सुद्धा अनेक अपेक्षा असणार आहेत. त्याने आयपीएलमध्ये ८७ सामने खेळले असून १२३.९५ च्या स्ट्राइक रेटने २३७५ धावा केल्या आहेत. त्याने १६ अर्धशतके लगावली आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी ही ९६ धावा ही होती. त्याच्यावर सुद्धा या हंगामात सर्वांचे लक्ष्य असणार आहे.
३. आंद्रे रसल
आंद्रे रसल फक्त गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीत सुद्धा उत्तम कामगिरी करतो. तसेच तो फिनिशरची सुद्धा भुमिका चांगल्या पद्धतीने निभावू शकतो. जर तो पुर्ण हंगाम खेळला तर तो संघासाठी एक्स-फॅक्टर म्हणून सिद्ध होऊ शकतो. त्याने आत्तापर्यंत ८४ आयपीएल सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १७८ च्या स्ट्राईक रेटने १७०० धावा केल्या आहेत. तसेच त्याने ७२ विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत.
४. ऋतुराज गायकवाड
चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाडला ६ कोटी रुपयांना रिटेन केले आहे. त्याने मागील हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप मिळवली होती. तो धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. त्याला पदार्पणाच्या हंगामात २०१९मध्ये जास्त सामने खेळायला मिळाले नव्हते. मागील हंगामात त्याने १ शतक आणि ४ अर्धशतकाच्या मदतीने ६३५ धावा केल्या होत्या. केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याच्यावर सर्वांचे लक्ष्य असणार आहे.
५. व्यंकटेश अय्यर
व्यंकटेश अय्यरला केकेआर संघाने ८ कोटींना विकत घेतले आहे. तो गोलंदाजीबरोबरच फलंदाजीत सुद्धा उत्तम कामगिरी करु शकतो. तो भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मध्ये त्याने २ विकेट्स घेण्याबरोबरच त्याने ३५ धावा सुद्धा केल्या आहेत. मागील हंगामात त्याने १० सामन्यांत ३७० धावा करण्याबरोबरच ३ विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
धोनीने सीएसकेची कॅप्टन्सी सोडल्यानंतर व्हायरल होतोय ‘हा’ जुना व्हिडिओ, पाहा काय म्हणालाय ‘थाला’
धोनीने विराटप्रमाणेच सोडले संघाचे कर्णधारपद, पाहा दोघांच्या निर्णयात काय आहे साम्य
अगग! बड्डेला ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा फक्त डक नव्हे तर डकचा नकोसा विश्वविक्रम, वाचा सविस्तर