यंदाच्या आयपीएलच्या १५व्या हंगामातील ६० सामने पूर्ण झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स संघात शुक्रवारी (दि. १३ मे) पार पडलेल्या ६०व्या सामन्यात पंजाबने ५४ धावांनी सामना खिशात घातला. हा पंजाबचा हंगामातील सहावा विजय होता. या विजयानंतर पंजाबने गुणतालिकेत (पॉईंट्स टेबल) मोठा बदल केला आहे. आठव्या स्थानी विराजमान असणारा पंजाब संघाने २ गुणांसह २ स्थानांची झेप घेतली आहे. तसेच, प्लेऑफमधील आपल्या अपेक्षा जिवंत ठेवल्या आहेत.
दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore)संघापुढील आव्हान वाढले आहे. बेंगलोर संघाने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यातील ७ सामन्यात विजय मिळवत चौथे स्थान काबीज केले आहे. मात्र, त्यांनी पुढील सामना गमावला, तर त्यांचे प्लेऑफचे गणित बिघडू शकते. चला तर जाणून घेऊया पंजाब किंग्स संघ कशाप्रकारे प्लेऑफमध्ये जागा बनवू शकतो.
पंजाब कशाप्रकारे बनवू शकतो प्लेऑफमध्ये जागा?
पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाला प्लेऑफचे दार ठोठावण्यासाठी १६ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि २२ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद संघांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. पंजाबसाठी एकही पराभव आव्हानात्मक ठरू शकतो. संघाकडे आता १२ सामन्यातील ६ विजयानंतर १२ गुण आहेत. आणखी २ विजयांनंतर त्यांचे १६ गुण होतील. यासोबत त्यांचा रनरेटदेखील चांगला होऊ शकतो. पंजाब किंग्स संघाने पुढील २ सामन्यात विजय मिळवला, तर ते प्लेऑफमध्ये जागा बनवू शकतात.
After Match No. 6⃣0⃣ of the #TATAIPL 2022, here's how the Points Table looks 🔽 #RCBvPBKS pic.twitter.com/tCYVb2Z47g
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
पंजाब किंग्सचे आव्हान सोपे नसेल. कारण, १६ गुणांसाठी राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ अजूनही मैदानात आहेत. राजस्थानचे अजून २, बेंगलोरचे १, दिल्लीचे २, हैदराबादचे ३ आणि कोलकाताचे २ सामने शिल्लक आहेत. अशात, पंजाब किंग्सला इतर संघाच्या प्रदर्शनावरही अवलंबून राहावे लागेल.
Reliving a sweet, sweet win ❤️🌟#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #RCBvPBKS #ਸਾਡਾਪੰਜਾਬ https://t.co/MEg9q0nave
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 13, 2022
असे असू शकते गणित
एकदाही आयपीएलच्या किताबाची चव न चाखणाऱ्या पंजाब संघाला प्लेऑफमध्ये एंट्री घेण्यासाठी २ विजय मिळवावे लागतील. जर राजस्थान संघ २ सामने पराभूत झाला, बेंगलोर संघ पुढील सामन्यात पराभूत झाला, दिल्ली संघ दोनपैकी एका सामन्यात विजय मिळवला, हैदराबादने तीनपैकी २ सामन्यातच विजय मिळवला आणि कोलकाताने जरी २ सामने जिंकले, तर पंजाबला सहजरीत्या प्लेऑफमध्ये एंट्री मिळेल. अशात, प्लेऑफचे हे गणित रंजक बनले आहे. त्यामुळे आठव्या क्रमांकावर सहाव्या क्रमांकावर उडी घेणारा पंजाब संघ प्लेऑफमध्ये एंट्री घेईल की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘किंग’ कोहलीचा नावाला साजेसा विक्रम! पंजाबविरुद्ध १ धाव काढताच अद्वितीय विक्रमाला घातली गवसणी