---Advertisement---

संपूर्ण हंगामाला मुकल्यानंतर दीपक चाहरचा चाहत्यांसाठी खास मेसेज, म्हणतोय, ‘मला माफ करा…’

Deepak-Chahar
---Advertisement---

सध्या मुंबई आणि पुणे स्थित चार स्टेडियमवर आयपीएल २०२२ हंगामातील लीग स्टेजचे सामने खेळले जात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापती अजून एकही सामना खेळू शकलेला नाहीये, अशात आता चाहत्यांसाठी खूपच निराशाजनक बातमी समोर आली आहे. चाहरची दुखापत गंभीर असल्यामुळे तो आयपीएलचा चालू असलेल्या संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाहीये. त्याने स्वतः याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलने दीपक चाहर (Deepak Chahar) आयपीएल २०२२चा संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही, असे म्हटले आहे. त्यानंतर दीपकने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याची पुष्टी केली आहे. अशात आता दीपकला मेगा लिलावात मिळालेल्या १४ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागणार यात कसलीही शंका नाही. सीएसकेने ही मोठी रक्कम खर्च करून त्याला संघात सामील केले होते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

अधिकृत ट्विटर खात्यावरून खास पोस्ट शेअर करत दीपक चाहरने लिहिले की, “मला यासाठी माफी हवी आहे की, दुर्दैवाने दुखापतीमुळे मी आयपीएलच्या चालू हंगामात खेळू शकणार नाही. मी खरंच स्पर्धेत खेळू इच्छित होतो, पण आता मी नेहमीप्रमाणे अजून चांगला आणि मजबूत होऊन पुनरागमन करेल. नेहमीप्रमाणेच माझे समर्थन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी तुमचे आभार. तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---