आयपीएलच्या मैदानात रविवारी (दि. ०८ मे) रात्री चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सला धूळ चारली. सीएसकेने हा सामना तब्बल ९१ धावांच्या अंतराने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेचा कर्णधार डेवॉन कॉनवेने सर्वाधिक धावांचे योगदान दिले आणि ऋतुराज गायकवाडने त्याचा उत्तम साथ दिली. सीएसकेचा डाव संपल्यानंतर ऋतुराजने दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्कियाचे कौतुक केले.
चेन्नईची सलामीवीर जोडी डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी पार पाडली. कॉनवेने ४९ चेंडूत सर्वाधिक ८७ धावा केल्या. तसेच ऋतुराजने ३३ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किया (Anrich Nortje) सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्ससाठी महागात पडला होता, पण शेवटच्या षटकात त्याने लागोपाट दोन विकेट्स घेतल्या. नॉर्कियाने टाकलेल्या ४ षटकात तब्बल ४२ धावा खर्च केल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. याच पार्श्वभूमीवर ऋतुराजने सीएसकेची फलंदाजी झाल्यानंतर त्याचे कौतुक केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एन्रीच नॉर्कियाच्या कौतुकात ऋतुराज गायकवाड म्हणाला की, “मला वाटते की, खेळपट्टी मागच्या दोन सामन्यांपेक्षा थोडी वेगळी आहे. सामना जसा-जसा पुढे जात राहिला, खेळपट्टी संथ होत गेली. एकदा आम्ही आतमध्ये आलो की, आम्ही पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला. खरंच तो (नॉर्किया) जागतिक पातळीचा गोलंदाज आहे. मला वाटते की, प्रथम फलंदाजी करत असताना, तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर तुम्ही तुमच्या सहकारी खेळाडूसोबत चर्चा केली पाहिजे.”