---Advertisement---

एमएस धोनीला तंबूत धाडल्यानंतर ‘हा’ पठ्ठ्या आहे भलताच खुश; म्हणाला, ‘मी चिंतेत होतो, पण…’

On: रविवार, एप्रिल 10, 2022 7:26 PM
MS-Dhoni
---Advertisement---

आयपीएल २०२२मध्ये चाहत्यांना एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. शनिवारी (दि. ०९ एप्रिल) झालेल्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ आमने- सामने होते. या सामन्यात हैदराबाद संघाने उत्कृष्ट प्रदर्शन दाखवत विजय मिळवला. सीएसकेसाठी हा त्यांचा हंगामातील सलग चौथा पराभव होता. हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सेनने या सामन्यात एमएस धोनीची विकेट घेतली आणि या कामगिरीसाठी आनंदी असल्याचेही सांगितले.

सनरायझर्से हैदराबादने हंगामातील त्यांचे पहिले दोन सामने गमावले आणि सीएसकेविरुद्धच्या या तिसऱ्या सामन्यासाठी काही बदल करून संघ मैदानात उतरला. दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सेन (Marco Jansen) याला हैदराबाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या सामन्यात मिळाली. हैदराबादसाठी त्याचा पहिला सामन्या खेळणाऱ्या जेन्सेनने मोठा मासा गळाला अडकवला. सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) जेन्सेनच्या चेंडूवर बाद झाला.

सीएसकेविरुद्धच्या सामन्याचा पहिला डाव संपल्यानंतर जेन्सेनने खास मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला की, “एमएस धोनीची विकेट मिळाल्यानंतर कोणीही आनंदीच होईल. सुरुवातीला मी चिंतेत होतो, पण संधी मिळाल्यानंतर चांगले वाटले. बदलांसोबत खेळणे सर्वात कठीण असते. माझ्यासाठी स्विंग जास्त नव्हता, त्यामुळे क्रॉस सीम रूटसाठी गेलो.”

https://twitter.com/SunRisers/status/1513064191028252672

सीएसकेविरुद्धच्या या सामन्यात मार्को जेन्सेनला संधी दिली गेली, पण सुरुवातीच्या षटकांमध्ये तो प्रभावी ठरू शकला नाही. परंतु सीएसकेच्या फलंदाजीवेळी १८व्या षटकात तो गोलंदाजीसाठी आला. या षटकातील तिसरा चेंडू त्याने स्लोअर बाऊंसर टाकला आणि एमएस धोनीला चकवा देत विकेट मिळवली. धोनीने या सामन्यात ६ चेंडू खेळले आणि अवघ्या ३ धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---