---Advertisement---

DC vs RR। शेवटच्या षटकात भलताच राडा, कर्णधार पंतने चालू सामन्यात केलेला फलंदाजांना मैदान सोडण्याचा इशारा

DC-vs-RR
---Advertisement---

मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर शुक्रवारी (२२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सला राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी पराभूत केले. या विजयानंतर गुणतालिकेत राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला. डावाच्या शेवटच्या षटकात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत मैदानावरील पंचांवर चांगलाच संतापल्याचे दिसले. पंचांनी कंबरेच्या वरच्या चेंडूला नो बॉल न दिल्यामुळे हा वाद घडला.

विजयासाठी शेवटच्या षटकात दिल्ली कॅपिटल्सला ३६ धावांची आवश्यकता होती. राजस्थानचा ओबेद मॅककॉय गोलंदाजीसाठी आला, तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी रोवमन पॉवेल होता. षटकातील सुरुवातीचे तिन्ही चेंडूवर पॉवेलने षटकार ठोकले आणि संघाला विजयाची आशा निर्माण झाली. यादरम्यान मॅककॉयने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूमुळे हा वाद झाला. त्याने हा चेंडू फुलटॉस घेकला होता आणि तो नो बॉल असू शकत होता. परंतु पंचाने त्याला नो बॉल करार दिला नाही. याच कारणास्तव कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) चांगलाच संतापला आणि त्याने खेळपट्टीवरील त्यांच्या फलंदाजांना मैदान सोडण्याचा इशारा देखील दिला.

दिल्लीच्या डग आऊटमधून नो बॉलची मागणी केली जात होती, पण पंचांनी तिसऱ्या पंचाकडे विचारणा न करता निर्णय दिला. त्यावेळी जोस बटलर सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता आणि त्याने पंतला समजवण्याचा प्रयत्न केला. तसेच, दिल्लीचा प्रशिक्षक शेन वॉटसनने देखील पंतला समज दिली. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक प्रवीण आमरे मैदानात धावत गेले आणि त्यांचा संघ खेळण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. पॉवेल सुरुवातीला चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण या वादानंतरच्या तीन चेंडूवर त्याला कमाल करता आली नाही. शेवटच्या तीन चेंडूवर त्याने अवघ्या २ धावा केल्या. परिणामी दिल्लीला १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

https://twitter.com/piyuSHejul/status/1517571221205905408?s=20&t=ZJ2b6Gbf2WM4cumKULX2og

पराभवानंतर पंत ज्या चेंडूमुळे वाद झाला, त्याविषयी म्हणाला की, “डगआउटमधील प्रत्येक जण निराश होता. सर्वांनी पाहिले की, हा एक नो बॉल होता. मला वाटते की, तिसऱ्या पंचांनी हस्तक्षेप करायला हवा होता आणि त्यांनी म्हटले पाहिजे होते की, हा नो बॉल आहे. आमरेंना मैदानात पाठवणे नक्कीच योग्य नव्हते, पण आमच्या सोबत जे झाले, ते देखील अयोग्यच होते.”

दरम्यान, राजस्थने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली आणि २ विकेट्सच्या नुकसानावर २२२ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा करता आल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

संपूर्ण हंगाम खेळून जे भल्याभल्यांना जमत नाही, ते बटलरने अवघ्या ७ सामन्यात केले; पाहा ‘बॉस’चा भीमपराक्रम!

बटलर-पडिक्कल जोडीने रचला इतिहास, भावांनी राजस्थान संघासाठी साकारली आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी

फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं! राजस्थानने १५ धावांनी उडवला दिल्लीचा धुव्वा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---