इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच सहभाग घेणारा संघ गुजरात टायटन्स रविवारी या टी-२० लीगचा विजेता संघ बनला. राजस्थान रॉयल्सला अंतिम सामन्यात त्यांनी ७ विकेट्सने पराभूत केले. यापूर्वी राजस्थान एकमेव संघ होता, ज्यांनी पदार्पणाच्या हंगामात विजेतेपद पटकावले होते, पण आता गुजरात देखील त्यांच्या पदार्पणाच्या सामन्यात विजेता संघ बनला आहे. ट्रॉफी जिंकण्याचा आनंद गुजरातच्या चाहत्यांसाठी आणि संघातील सर्वांसाठी अविस्वमरणीय आहे.
उभय संघातील हा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून याठिकाणी अंतिम सामना पाहण्यासाठी एक लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते. एखादा क्रिकेट सामना पाहण्यासाठी एवढ्या मोठ्या संखेने चाहते जमण्याची ही कदाचीत पहिलीच वेळ असावी. अहमदाबादमध्ये सामना असल्यामुळे गुजरात टायटन्सचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
गुजरातचा सलामीवीर शुबमन गिलने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकवला आणि स्टेडियममध्ये जल्लोष सुरू झाला. आकाशात आतिषबाजी सुरू झाली. खेळपट्टीवरील गिल आणि डेविड मिरलकडे सर्वजण कौतुकाने पाहत होते. या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. एकंदरीत सामना जिंकल्यानंतरचे मैदानातील वातावरण गुजरातच्या प्रत्येक चाहत्यासाठी विसरणे सोपे नाहीये. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
.@gujarat_titans – The #TATAIPL 2022 Champions! 👏 👏 🏆 👍
The @hardikpandya7-led unit, in their maiden IPL season, clinch the title on their home ground – the Narendra Modi Stadium, Ahmedabad. 🙌🙌 @GCAMotera
A round of applause for the spirited @rajasthanroyals! 👏 👏 #GTvRR pic.twitter.com/LfIpmP4m2f
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याची भूमिका महत्वाची राहिली. त्याने प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीमध्ये संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले. पंड्याने प्रथम गोलंदाजी करताना ४ षटके टाकली आणि यामध्ये अवघ्या १७ धावा खर्च करून ३ महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. गुजरातच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे राजस्थान प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या १३० धावा करू शकला. प्रत्युत्तरात जेव्हा गुजरातची वरची फळी स्वस्तात बाद झाली, तेव्हा हार्दिकने गिलसोबत मिळून संघाचा डाव सांभाळला.
फलंदाजीमध्ये त्याने ३० चेंडूत ३४ धावांचे योगादन दिले आणि बाद झाला. त्यानंतर डेविड मिलर आणि गिल यांनी संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानसाठी त्यांचा सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावांचे योगदान दिले. गुजरातचा सलामीवीर शुबमन गिलने नाबाद ४५ धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कर्णधार हार्दिकचेही मास्टर धोनीच्या पावलावर पाऊल, ट्रॉफी जिंकल्यानंतर केले ‘हे’ कौतुकास्पद काम
महाराष्ट्राच्या पैलवानांचा नादच खुळा! इतिहासात पहिल्यांदाच केली ‘ही’ खास कामगिरी
आरसीबीचा हिरो ठरलेल्या रजत पाटीदार किती करतो कमाई? जाणून घ्या सविस्तर