आयपीएलच्या मैदानात शनिवारी (दि. २३ एप्रिल) डबल हेडर सामन्यातील पहिला खेळला गेले. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळला गेला असून केकेआरचा मध्यक्रमातील फलंदाजी रिंकू सिंगने मैदान चांगलेच गाजवले. रिंकूने फलंदाजी करताना ३५ धावांचे योगदान दिले, पण क्षेत्ररक्षण करताना मात्र अप्रतिम प्रदर्शन केले.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी जेव्हा गुजरात टायटन्सचा संघ मैदानात आला, तेव्हा त्यांचे चार खेळाडू रिंकू सिंग (Rinku Singh) याच्या हातून झेलबाद झाले. गुजरातने मर्यादित २० षटकात ९ विकेट्स गमावल्या आणि १५६ धावा केल्या. या अप्रतिम कामगिरीनंतर रिंकू सिंग आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आहे, ज्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल २०२१ मधील एका सामन्यात ५ झेल घेतले होते. रिंकू सिंग आता आयपीएलच्या इतिहासातील आठवा खेळाडू ठरला आहे, ज्याने एका सामन्यात चार झेल घेतले आहेत.
Bhaiya mein Bhaiya! Rinku Bhaiya!#KKRHaiTaiyaar #KKRvGT #IPL2022 pic.twitter.com/T445mhq3f2
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 23, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यादीत दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडूलकर आहे. सचिनने केकेआरविरुद्ध आयपीएलचा पहिला हंगाम म्हणजेच २००८ साली ही कामगिरी केली होती. त्यानंतर डेविड वॉर्नरने राजस्थान सॉयल्सविरुद्ध २०१० मध्ये, जॅक कॅलिसने २०११ मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध, राहुल तेवतियाने २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रत्येकी चार झेल घेतले होते. यादीत पुढे डेविड मिलर आहे, ज्याने २०१९ हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध, फाफ डू प्लेसिसने केकेआरविरुद्ध, रवींद्र जडेजाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रत्येकी चार झेल घेतले होते. आता गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चार झेल नावावर करणारा रिंकू सिंग या यादीत नव्याने सहभागी झाला आहे.
आयपीएलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू (क्षेत्ररक्षक)
५- मोहम्मद नबी (विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०२१)
४- सचिन तेंडुलकर (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २००८)
४- डेविड वॉर्नर (विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०१०)
४- जॅक कॅलिस (विरुद्ध डेक्कन चार्जर्स, २०११)
४- राहुल तेवतिया (विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१९)
४- डेविड मिलर (विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१९)
४- फाफ डू प्लेसिस (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २०१९)
४- रवींद्र जडेजा (विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०२१)
४- रिंकू सिंग (विरुद्ध गुजरात टायटन्स, २०२२)*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बटलर आहे कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये, आवडच्या स्टेडियमवर सलामीवीराने केला खुलासा
Video: अवघे काही मीटर कमी पडले, नाहीतर बटलरने वानखडे स्टेडियमच्या बाहेर मारला असता षटकार
नो बॉल विवादावरून प्रशिक्षक वॉटसनचा दिल्ली संघालाच घरचा आहेर; म्हणाला, ‘हे स्विकाहार्य नाही’