चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी रविवारी (८ मे) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ८ चेंडूत नाबाद २१ धावा चोपल्या आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. या प्रदर्शनाच्या जोरावर धोनीने स्वतःच्या टी-२० क्रिकेटमधील ६००० धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय कर्णधार बनला. तसेच, आयपीएलमध्ये डावाच्या १९व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू देखील बनला.
धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटच्या षटकांमध्ये चांगली धुलाई केली. २१ धावा करण्यासाठी त्याने १ चौकार आणि २ षटकारांची मदत घेतली. या कामगिरीनंतर धोनीने कर्णधाराच्या रूपात खेळताना वैयक्तिक ६००० टी-२० धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वाधिक टी-२० धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये एमएस धोनी (MS Dhoni) दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत ६४५१ धावांच्या जोरावर विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या क्रमांकावर आहे, तर ४७६४ धावांच्या जोरावर रोहित शर्मा (Rohit Sharma) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सर्वाधिक टी-२० धावा करणारे भारतीय कर्णधार
६४५१ धावा- विराट कोहली
६००० धावा- एमएस धोनी*
४७६४ धावा- रोहित शर्मा
धोनीचा दुसरा मोठा विक्रम
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धोनीने दुसरा महत्वाचा विक्रम केला, तो म्हणजे १९व्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा. दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज खलील अहमद १९व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर धोनीने षटकार मारला आणि यादीत पहिला क्रमांक पटकावला. यापूर्वी आयपीएलमध्ये १९व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये एबी डिविलियर्स आणि एमएस धोनी संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर होते. आता धोनीने डिविलियर्सला मागे टाकले आहे.
आयपीएलमध्ये १९ व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
३७ षटकार- एमएस धोनी*
३६ षटकार- एबी डिविलियर्स
२७ षटकार- आंद्रे रसेल
२४ षटकार- कायरन पोलार्ड
२४ षटकार- हार्दिक पांड्या
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर सीएसकेने प्रथम फलंदाजी केली. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली, पण सीएसकेला मर्यादित धावसंख्येवर रोखू शकले नाहीत. सीएसकेने ६ विकेट्सच्या नुकसानावर तब्बल २०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघ सर्वबाद होत ११७ धावाच करू शकला. त्यामुळे सीएसकेने ९१ धावांनी सामना खिशात घातला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! आधी जडेजाचं कर्णधारपद गेलं अन् आता संघातूनही केली हाकालपट्टी
वनिंदू हसरंगाचा नाद खुळा विक्रम! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा बेंगलोरचा दुसरा ‘रॉयल’ खेळाडू