आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात सुरेश रैनाला एकही खरेदीदार मिळाल नाही आणि आता तो समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण देखील आयपीएलमध्ये सामालोचकाची भूमिका पार पाडत आहे. १ एप्रिल रोजी आयपीएलच्या मैदानात पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यादरम्यान समलोचन करताना इरसफान पठाण आणि त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांनी नवख्या सुरेश रैनाला एप्रिल फूल बनवले होते.
लाईव्ह सामन्यात समालोचक इरफान पठाणला विचारले गेले की, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या (PBKS vs KKR) सामन्यात कोणाचे पारडे जड आहे? या प्रश्नावर इरफानने पंजाब किंग्जची बाजू घेतली. समालोचकांच्या भूमिकेत असल्यामुळे इरफान पठाण (Irfan Pathan) पंजाब किंग्जचे कौतुक करत होता. इरफान म्हणाला की, पंजाब किंग्जने पहिल्या सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. ऑक्शनमध्ये त्यांनी सर्व विभागांमध्ये चांगले खेळाडू घेतले आहेत.
इरफान पुढे बोलताना म्हणाला, २००८ मध्ये त्यांचा संघ चांगला होता. २०१४ मध्ये ते अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले होते. सथ्या त्यांचा सघ खूप मजबूत आहे, फलंदाजही चांगले आहेत. तितक्यात सुरेश रैना (Suresh Raina) मध्ये बोलतो. रैना म्हणतो की, इरफान तीन वर्ष पंजाबसाठी खेळला आहे आणि प्रीती झिंटा पंजाबची मालकीन आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे.
या प्रसंगानंतर इरफान रागावल्याचे पाहायला मिळाले. तो म्हणाला की, प्रत्येक वेळी क्रिकेटमध्ये फीमेल अँगल आणण्याची गरज नाही. याठिकाणी मी संघाविषयी बोलत आहे. मला तुमचे हे बोलणे ऐकून चांगले वाटले नाही. त्यानंतर इरफान सहकाऱ्यांपासून लांब जाऊन एकटाच खुर्चीवर बसतो आणि रैना त्याची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात दिसतो. शेवटी सर्वजण मिळून खुलासा करतात की, हा फक्त एक प्रँक होता.
When @IrfanPathan stumped everyone with his prank on @ImRaina! ????
Catch this #AprilFoolsDay special ????, and for more of such fun, do not miss #Byjus #CricketLIVE:
Single matchdays: 6:30 PM | Double matchdays: 2:30 PM | Star Sports & Disney+Hotstar pic.twitter.com/j36YgSZjf0
— Star Sports (@StarSportsIndia) April 1, 2022
दरम्यान, पंजाब किंग्ज आणि केकेआरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याचा विचार केला, तर आंद्रे रसेल (३१ चेंडूत ७० धावा) आणि उमेश यादवच्या (२४ धावा खर्च करून ४ विकेट्स) अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर केकेआरने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा संपूर्ण संघ अवघ्या १३७ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात केकेआरने हे लक्ष्य १४.३ षटकांमध्ये आणि ४ विकेट्सच्या नुकसानावर गाठले
महत्वाच्या बातम्या –
एक नाही, दोन नाही, तर सगळ्या संघालाच जेव्हा दिली होती ‘मॅन ऑफ द मॅच’





