मुंबई। रविवारी (१० एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात चौथा डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळवला जाणार आहे. रविवारचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. तसेच त्याआधी दुपारी ३ वाजता नाणेफेक होईल. या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू.
असा असू शकतो कोलकाता नाईट रायडर्सचा संभावित संघ
आयपीएल २०२२ हंगामात (IPL 2022) कोलकाता नाईट रायडर्सने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताने १५ व्या आयपीएल हंगामात पहिल्या ४ सामन्यांपैकी ३ सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवलेला आहे. आता त्यांना पाचवा सामना दिल्लीविरुद्ध खेळायचा आहे. दरम्यान, या सामन्यातून श्रेयस (Shreyas Iyer) पहिल्यांदाच दिल्लीविरुद्ध आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. तो २०२१ पर्यंत दिल्ली संघाचा भाग होता.
दरम्यान, या सामन्यासाठी कोलकाताच्या संभावित ११ जणांच्या (KKR Predicted XI) संघाचा विचार करायचा झाल्यास अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर मागील काही सामन्यांप्रमाणेच सलामीला फलंदाजी करू शकतात. तसेच कोलकाताची मधली फळी कर्णधार श्रेयससह यष्टीरक्षक सॅम बिलिंग्स, नितीश राणा सांभाळताना दिसू शकतात. तर अष्टपैलूच्या भूमिकेत आंद्रे रसेल आणि सुनील नारायण दिसण्याची दाट शक्यता आहे. गोलंदाजी फळी पॅट कमिन्ससह उमेश यादव, वरूण चक्रवर्ती यांना सांभाळावी लागेल. यामध्ये त्यांना रविवारी रसिक सलामचीही साथ मिळू शकते.
कोलकाता नाईट रायडर्सचा संभावित संघ – अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, वरूण चक्रवर्ती, रसिक सलाम.
असा असू शकतो दिल्ली कॅपिटल्सचा संभावित संघ
दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएलच्या १५ व्या हंगामात काहीसा संघर्ष करताना दिसत आहे. त्यांना आत्तापर्यंत ३ सामन्यांपैकी २ सामने पराभूत झाले असून १ सामना जिंकला आहे. त्यामुळे रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स संघाला विजयी मार्गावर परतण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
दरम्यान, कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीच्या संभावित ११ जणांच्या (DC Predictes XI) संघाबद्दल विचार करायचा झाल्यास पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर ही जोडी सलामीला दिसू शकते. तर मधल्या फळी कर्णधार रिषभ पंतसह (Rishabh Pant) रोवमन पॉवेल, सर्फराज खान, ललित यादव दिसू शकतात. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून अक्षर पटेल असेल. त्याच्यावर फिरकी गोलंदाजीचीही जबाबदारी असेल. याबरोबरच गोलंदाजी फळीत शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझुर रहामान आणि एन्रीच नॉर्किया यांना संधी मिळू शकते.
दिल्ली कॅपिटल्सचा संभावित संघ – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), रोवमन पॉवेल, सर्फराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझुर रहामान, एन्रीच नॉर्किया.
अशी असू शकते ड्रीम ११
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (KKR vs DC) संघात होणाऱ्या सामन्यात ड्रीम ११ चा (Dream XI) विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत आणि सॅम बिलिंग्स यांना संधी दिली जाऊ शकते. तसेच फलंदाजीत श्रेयस अय्यर, नितीश राणा, पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. अष्टपैलू म्हणून वेंकटेश अय्यर आणि अक्षर पटेल यांना संधी दिली जाऊ शकते, तर गोलंदाजीसाठी कुलदीप यादव, एन्रीच नॉर्किया, उमेश यादव यांची निवड करू शकतो. कर्णधार म्हणून वेंकटेश अय्यर आणि उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची निवड होऊ शकते.
कर्णधार – वेंकटेश अय्यर
उपकर्णधार – श्रेयस अय्यर
यष्टीरक्षक – रिषभ पंत आणि सॅम बिलिंग्स
फलंदाज – श्रेयस अय्यर, नितीश राणा, पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर
अष्टपैलू – वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल
गोलंदाज – कुलदीप यादव, एन्रीच नॉर्किया, उमेश यादव.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल कोलकाता वि. दिल्ली सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
इकडं धोनी ३६० डिग्री फिरला, अन् तिकडं चाहत्यानं पकडलं डोकं; व्हिडिओ जोरदार व्हायरल