शुक्रवारी (दि. १३ मे) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स संघात आयपीएलचा ६०वा सामना खेळला गेला. हा सामना पंजाब किंग्स संघाने ५४ धावांनी जिंकला. या विजयासह त्यांनी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, दुसरीकडे, या सामन्यादरम्यान बेंगलोर संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल वेगळ्याच रंगात दिसला. त्याची फलंदाजी पाहून विराट कोहली देखील जोशमध्ये दिसला. यादरम्यानचा त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
झाले असे की, पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत २०९ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १५५ धावाच करता आल्या. बेंगलोरच्या डावाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांच्या पहिल्या ३ विकेट या ७ षटकातच पडल्या. त्यावेळी धावफलकावर त्यांच्या ५३ धावा होत्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने वादळी खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोठी भर घातली. ८व्या षटकात जेव्हा राहुल चाहर गोलंदाजी करत होता, तेव्हा ग्लेन मॅक्सवेलने जो स्विच हिट शॉट मारला, तो पाहून डगआऊटमध्ये बसलेला विराट कोहली देखील जोशमध्ये दिसला. इतकेच नाही, तर स्टेडिअममध्ये उपस्थित असलेली मॅक्सवेलची पत्नी विनी रमणदेखील हा शॉट पाहून हैराण झाली. मॅक्सवेलच्या या षटकाराने संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली.
Check out Switch-hit: A trademark Maxwell maximum on IPL 2021: https://t.co/GAB4BhlwPB
— jasmeet (@jasmeet047) May 13, 2022
मॅक्सवेलने आयपीएलमध्ये अनेकदा डावाच्या सुरुवातीला गोलंदाजी केली आहे. त्याने आपला माजी संघ असलेल्या पंजाब किंग्सविरुद्ध पहिलेच षटक टाकले. या षटकात त्याने ८ धावा दिल्या, पण विकेट मिळाली नाही. मात्र, नंतर गोलंदाजीला आल्यानंतर मॅक्सवेलने शिखर धवनची विकेट काढली. पंजाब संघाने पहिल्या पॉवरप्लेमध्ये ८३ धावा बनवल्या होत्या. यादरम्यान धवन आणि बेअरस्टो हे जोरदार धावांचा पाऊस पाडत होते. मात्र, मॅक्सवेलने धवनची विकेट घेतल्यानंतर धावांचा वेग जरा कमी झाला.
मॅक्सवेलच्या आयपीएलमधील गोलंदाजी कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १०७ सामन्यात ८.३५च्या इकॉनॉमी रेटने २७ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये १५ धावा देत २ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी आणखी करू तरी काय?’, अवघ्या २० धावांवर तंबूत परतताना विराटची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद; चाहतेही दु:खी