बुधवारी (दि. १८ मे) आयपीएल २०२२मधील ६६वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडला. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात लखनऊ संघाने २ धावांनी विजय मिळवला. यासोबतच लखनऊ संघाने प्लेऑफ फेरीचे आपले तिकीट पक्के केले. अशी कामगिरी करणारा लखनऊ संघ आयपीएल २०२२मधील दुसरा संघ बनला.
या सामन्यात लखनऊ संघाने (Lucknow Super Giants) नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २१० धावा चोपल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता (Kolkata Knight Riders) संघाला २० षटकात ८ विकेट्स गमावत २०८ धावाच करता आल्या. यावेळी लखनऊचा वेगवान गोलंदाज मोहसिन खान (Mohsin Khan) याने जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २० धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) मोहसिनच्या गोलंदाजीने प्रभावित झाला आणि त्याने त्याचे गुणगान गाताना मोठे वक्तव्य केले.
मोहसिनचे कौतुक करताना राहुल म्हणाला की, “मोहसिन खान जेव्हापासून खेळत आहे तेव्हापासून तो चमकदार कामगिरी करत आहे. त्याच्याकडे एक उत्तम शैली आहे आणि ती खूप चांगली वापरत आहे. कधी मंद गोलंदाजी करायचा आणि कधी वेगवान गोलंदाजी करायची हे त्याला माहीत आहे. तो लवकरच भारतीय संघाची जर्सी परिधान करेल यात शंका नाही. भारतीय संघाची नजर नेहमीच डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांवर असते.”
Mohsin Khan with his third wicket of the game and this time it is the big wicket of Andre Russell.
Live – https://t.co/NbhFO1ozC7 #KKRvLSG #TATAIPL pic.twitter.com/uH5v69doZZ
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याव्यतिरिक्त राहुलने सामन्यात शानदार शतक झळकावणाऱ्या क्विंटन डी कॉक याचेही कौतुक केले. डी कॉकने ७० चेंडूत १० चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १४० धावांचा पाऊस पाडला होता. राहुल म्हणाला की, “आज शेवटच्या षटकात मी प्रेक्षक होतो. डी कॉकने संपूर्ण हंगामात शानदार फलंदाजी केली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये आम्ही इथे मागे पडलो की, जे लोक चांगली कामगिरी करत होते, ते आम्हाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. डी कॉकने शेवटपर्यंत फलंदाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले हे पाहून खूप आनंद झाला.”
आयपीएलचे ६६ सामन्यानंतरचे टॉप ४ संघ
आयपीएल २०२२मधील ६६ सामने पार पडले आहेत. या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये अनुक्रमे गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आहेत.