---Advertisement---

केएल राहुल आला, बोल्टने पाहिला अन् थेट तंबूतही धाडला, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘झक्कास’

On: सोमवार, एप्रिल 11, 2022 12:19 AM
Trent-Boult-And-KL-Rahul
---Advertisement---

रविवारी (१० एप्रिल) आयपीएल २०२२चा २०वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला गेला. केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनऊ सुपर जायंट्ससाठी हा त्यांचा चालू हंगामातील ५ वा सामना होता. पण राहुल अपेक्षित खेळी करू शकला नाही. लखनऊ संघाला राजस्थानकडून ३ धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्याच चेंडूवर राहुलला तंबूत धाडले.

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ६ विकेट्सच्या नुकसानावर १६५ धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात मैदानात आलेल्या लखनऊ संघाला राहुलच्या रूपात पहिल्याच चेंडूवर मोठा झटका बसला.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्सकडून केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक ही सलामीवीरांची जोडी सर्वप्रथम मैदानात आली. राजस्थानकडून पहिल्या षटकात न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) गोलंदाजीसाठी आला होता. बोल्टने डावाच्या पहिल्याच चेंडूवर अनपेक्षितपणे राहुलचा त्रिफळा उडवला. बोल्टने टाकलेला हा चेंडूत आतल्या बाजूने स्विंग  झाला आणि थेट स्टंपमध्ये घुसला. या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी बोल्टचे चाहत्यांकडून सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे, तर दुसरीकडे राहुलचे चाहते मात्र निराश झाले.

https://twitter.com/AmitKum50993580/status/1513192523040141312?s=20&t=BGBYpkncOfUq8GRgj-Ti_Q

आयपीएल २०२२ हंगामातील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा सलामीसाठी आलेला राहुल शून्य धावांवर बाद झाला. लखनऊने हंगामातील पहिला सामना लखनऊने गुजरात टायटन्ससोबत खेळला होता. या सामन्यात राहुल एकही धाव करू शकला नव्हता. त्यानंतर आता राजस्थान विरुद्धच्या सामन्यात राहुल गोल्डन डक (डावाच्या पहिल्या चेंडूवर बाद) झाला आहे.

गुजरात आणि राजस्थान संघाविरुद्धचे दोन सामने सोडले, तर राहुलने प्रदर्शन चालू हंगामात बऱ्यापैकी राहिले आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याने ४०, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ६८ आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २४ धावा केल्या आहेत. आगामी सामन्यांतील त्याच्या प्रदर्शनावर चाहत्यांची नक्कीच नजर राहणार आहे.

लखनऊ आणि राजस्थान (LSG vs RR) यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंजीचा निर्णय घेतला. राजस्थानने दिलेल्या १६६ धावांचा पाठलाग करताना अवघ्या ५२ धावांवर ४ आणि ७४ धावांवर ५ विकेट्स गमावल्या. लखनऊसाठी जेसन होल्डर आणि कृष्णाप्पा गौथम यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. राहुल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला कृष्णप्पा देखील शून्य धावांवर बाद झाला आणि यावेळीही चेंडू ट्रेंट बोल्डच्याच हातात होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

RCB vs MI सामन्यात घुसणे चाहत्याच्या अंगाशी; पोलिसांना नडल्याने गेला थेट तुरुंगात

‘सूर्या’ची बॅटिंग पाहून शास्त्रींना आठवला थेट एबी डिविलियर्स; गोडवे गात म्हणाले, ‘असे खेळाडू…’

एकच मारला, पण विक्रमी ठरला! रिषभ पंतचा केकेआरविरुद्धचा षटकार ठरला विक्रमी, बनला ‘नंबर १’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---