आयपीएलच्या २०२२ हंगामापूर्वी बीसीसीआय मेगा लिलावाचे आयोजन करणार आहे. हा मेगा लिलाव पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोजित होईल अशी माहिती समोर आली आहे. यावर्षी होणारा मेगा लिलाव दोन दिवस चालणार आहे आणि याचे आयोजन बंगळूरुमध्ये होईल.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार यासाठी तयारी देखील सुरू झाली आहे. तत्पूर्वी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, हा मेगा लिलाव यूएईत आयोजित केला जाणार आहे, परंतु बोर्ड सध्या असा विचार करत नाही.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने मेगा लिलावाविषयी माहिती दिली आहे. मेगा लिलाव पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात १२ आणि १३ तारखेला बंगळूरूमध्ये होईल.
कोरोना महामारीमुळे परिस्थिती जर खराब झाली नाही, तर मेगा लिलाव भारतात होईल. असे असले तरी, भारतात मागच्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशात मेगा लिलाव भारताच्या बाहेरही आयोजित केला जाऊ शकतो, अशा चर्चा आहेत.
व्हिडिओ पाहा – जगातील कोणत्याही फलंदाजाला १० प्रकारे तुम्ही करु शकता बाद
पुढच्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या १५ व्या हंगामात एकूण १० संघ सहभाग घेणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन फ्रँचायझींना लीगमध्ये नव्याने सामील केले गेले आहे. अशात या दोन संघांसाठी मेगा लिलाव महत्वाचा असणार आहे. मेगा लिलावापूर्वी या संघांना तीन खेळाडूंना रिटेन करण्याची संधी दिली गेली आहे, ज्याची मुदत २५ डिसेंबरपर्यंत आहे. परंतु खेळाडूंना रिटेन करण्यासाठी या फ्रेंचायझींना बीसीसीआयकडून मुदत वाढवून मिळण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा – आयपीएल फ्रँचायझी मालकांसोबत बीसीसीआयची होणार महत्त्वपूर्ण बैठक, ‘या’ गोष्टींवर होईल चर्चा
कोरोनाच्या ऑमिक्रॉन व्हेरियंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीसीसीआय सर्व फ्रेंचायझींच्या मालकांसोबत एक महत्वाची बैठक घेणार आहे, अशा बातम्या आल्या आहेत. ही बैठक जानेवारी महिन्यात आयोजित केली जाऊ शकते. या बैठकीत ओमिक्रॉन व्हेरिंएटच्या वाढत्या प्रादुर्भावावर आणि आयपीएलच्या आयोजनावर महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
मागच्या हंगामात खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा आर्ध्यातून स्थगित केली गेली होती आणि उर्वरित सामने नंतर यूएईत खेळावे लागले होते. यावेळी मात्र बीसीसीआय प्लान बी तयार ठेवणार असल्याचेही सांगितले गेले आहे.
महत्वाच्या बातम्या –
क्लब कबड्डी ते प्रो कबड्डीपर्यंतचा प्रवास करणारा कल्याणचा ‘पोस्टर बॉय’ श्रीकांत जाधव
‘या’ दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांपासून टीम इंडियाला असेल धोका, माजी भारतीय दिग्गजाने केले सावध
व्हिडिओ पाहा –