आयपीएल २०२२ मध्ये नव्याने सहभागी झालेला संघ लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये पोहोचला, पण बुधवारी (२५ मे) रात्री ते स्पर्धेतून बाहेर पडले. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्यांना मात दिली आणि त्यांचा चालू हंगामातील प्रवास इथेच संपला. लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरने एलिमिनेटर सामन्यातील पराभवानंतर एक खास पोस्ट केली. गंभीरने या हंगामातील संघाचे प्रदर्शनाचे कौतुक केले आणि पुढच्या हंगामात त्यांचा संघ अधिक चांगले प्रदर्शन करेल, असे आश्वासन देखील दिले.
लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्या पहिल्याच आयपीएल हंगामात चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. संघानेही पहिल्या प्रयत्नात स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. संघाच्या चांगल्या प्रदर्शानामागे मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची भूमिका महत्वाची राहिली आहे. हंगामातील संघाचा प्रवास संपल्यानंतर गंभीरने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करून लिहिले की, “आज आमचे नशीब चांगले नव्हते, पण आमच्यासाठी हा हंगाम अप्रतिम राहिला. पुढच्या हंगामात आम्ही अजून मजबूतीसह उतरू.”
View this post on Instagram
हंगामातील पहिल्या सामन्यात लखनऊ संघाला गुजरात टायटन्सकडून मात मिळाली होती. पण नंतर संघाने जबरदस्त प्रदर्शन केले आणि प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले. गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे संघाकडे अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी फक्त एक संधी होती, जी आरसीबीने त्यांच्याकडून हिसकावली. एलिमिनेटर सामन्यात आरसीबने लखनऊला १४ धावांनी पराभूत केले आणि दुसऱ्या क्वालिफायमध्ये जागा पक्की केली.
बुधवारी खेळेल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ४ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या. लखनऊचा संघ मात्र मर्यादित २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकासनावर १९३ धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी आरसीबीने १४ धावांनी विजय मिळवला.
गौतम गंभीर भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज राहिला आहे. त्याने संघाला २०११ साली विश्वचषक मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या इतिहासात २ विजेतेपद जिंकले आहेत. या दोन्ही वेळी केकेआरचे नेतृत्व गौतम गंभीरच्या हातात होते. आता यावर्षी गंभीर लखनऊच्या मेंटॉरच्या भूमिकेत दिसला आणि त्याने ही जाबाबदारी देखील चांगल्या प्रकारे पार पाडली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मैदानात घुसलेल्या चाहत्याला पोलिसांनी थेट उचललं खांद्यावर, विराटही झाला चकीत; Video व्हायरल
गेम! एका भारतीय क्रिकेटरने ठरवून पाकिस्तानी खेळाडूला जिंकू दिली नव्हती ऑडी कार
वाढदिवस विशेष! बॉलिवूडच्या ‘किंग खान’च्या नावावर आपले नाव ठेवणारा शाहरुख खान