---Advertisement---

चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी बूम बूम बुमराहने गाळला घाम; ट्रेनिंगदरम्यानचा खास व्हिडिओ व्हायरल

On: गुरूवार, एप्रिल 21, 2022 12:23 AM
Jasprit-Bumrah
---Advertisement---

आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स संघ अद्याप अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाहीये. मुंबई हंगामातील सुरुवातीच्या ६ सामन्यांपैकी एकही जिंकला नाहीये. त्यांचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील चांगल्या प्रदर्शनाच्या प्रयत्नात आहे, पण त्यालाही अपेक्षित यश मिळाले नाहीये. गुरुवारी (२१ एप्रिल) मुंबईचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. या सामन्याआधी बुमराहने मैदानात चांगलाच घाम गाळला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा विजेतेपद पटाकावणारा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ चालू हंगामात अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. सीएसकेला पराभूत करून संघ त्यांचा पहिला विजय मिळवू इच्छित आहे. अशात सर्व खेळाडू या सामन्यापूर्वी कसून सराव करत आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) देखील यामध्ये मागे राहिला नाहीये. मैदानात सराव करत असेलल्या बुमराहचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जसप्रीत बुमराहने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो झेल घेण्याचा आणि सोबतच क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसत आहे. बुमराहने अनेक ट्रिक्सवर काम केले आहे. व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. व्हिडिओत त्याने वेगवेगळ्या पद्धतीने सराव केल्याचे पाहायला मिळत आहे आणि चाहत्यांना त्याच्याकडून पुढच्या सामन्यात चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.

चालू हंगामात मुंबईसाठी खेळलेल्या सुरुवातीच्या ६ सामन्यांमध्ये बुमराहने अवघ्या ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी केलेले प्रदर्शन पाहता हे आकडे सामान्य आहेत. अशात सीएसकेविरुद्धच्या सामन्यात तो काय कमाल करून दाखवतो, हे पाहावे लागणार आहे. चालू हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबईने पहिला पराभव पत्करला आणि हे सत्र पुढे सुरूच राहिले. त्यानंतर मुंबईने राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्याकडून पराभव पत्करला आहे.

एकंदरीत बुमराहच्या आयपीएल प्रदर्शनावर नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत ११२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १३४ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहचे आयपीएलमधील सर्वोत्तम प्रदर्शन १४ धावा खर्च करून ४ विकेट्स घेण्याचे आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘रिषभ पंतने फॉर्ममध्ये येणे खूप गरजेचे, नाहीतर…’, भारताच्या माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

‘माझं तोंड बघून तुला कळत नाही का?’, वाचा रोहितच्या ‘त्या’ प्रश्नावर असं का म्हणालेला सूर्यकुमार

आयपीएल २०२२च्या खाणीतून टीम इंडियाला मिळाले ‘हे’ ३ हिरे; आगामी टी-२० विश्वचषकात मिळवू शकतात स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---